काँग्रेसमधून माझ्या हकालपट्टीची शिफारस? मुंबई काँग्रेस शिवसेनेत विलीन झाली काय?; संजय निरूपम यांचा तिखट सवाल


वृत्तसंस्था

मुंबई : पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी काँग्रेस नेते माजी खासदार संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टीच्या शक्यतेची बातमी येताच निरूपम यांनी तिखट हल्ला केलाय. “मी फक्त शिवसेनेवर टीका केली. काँग्रेस विरोधात बोललोच नाही. मग पक्षविरोधाबद्दल कारवाईचे कारणच काय? मुंबई काँग्रेस शिवसेनेत विलीन झाली काय?, असा तिखट सवाल निरूपम यांनी केलाय.

राजस्थानमधील काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्याविरोधात कारवाई केल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांचीही पक्षातून हकालपट्टी होण्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर निरुपम यांनी ट्विट करून त्यांच्यावर होणाऱ्या संभाव्य कारवाईवर परखड मत व्यक्त केले. मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी माझ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी हायकमांडकडे केल्याची बातमी आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित भूखंड घोटाळ्याच्या चौकशीची मी मागणी केली आहे. त्यामुळे माझ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. शिवसेनेविरोधात बोलणे ही काँग्रेस पक्षाविरोधी कारवाई होऊ शकते का? मुंबई काँग्रेस शिवसेनेत विलीन झाली आहे का?, असा भडिमार निरुपम यांनी ट्विटवरून केला. निरुपम यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

संजय निरुपम यांनी काँग्रेस सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीवरही त्यांनी सातत्याने टीका केली आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी निरुपम यांच्या या पक्षविरोधी कारवायांचा एक विस्तृत अहवाल तयार करून हायकमांडला पाठवला असून निरुपम यांच्यावर कारवाईची मागणीही केल्याचं सूत्रांनी सांगितले.

मात्र, आपले ट्विट्स किंवा वक्तव्य काँग्रेस पक्षविरोधात वाटत नाहीत. महाविकास आघाडी स्थापन करू नये हे माझं पहिल्या दिवसापासूनचं मत होते. आताही सरकारमध्ये काँग्रेसची काहीच भूमिका नाहीये. सर्व काम शिवसेना आणि राष्ट्रवादीच करत आहे. गेल्या सहा महिन्यांत सरकारमध्ये काँग्रेसचे अस्तित्वच दिसून आलेले नाही. संपूर्ण पक्षच क्वॉरंटाइन झाला आहे, अशी प्रतिक्रिया निरुपम यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना व्यक्त केली होती. या संपूर्ण पार्श्वभूमीवर निरुपम यांनी हा सवाल केला आहे.

तसेच, गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी दरम्यान निरुपम यांनी थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाच आव्हान दिले होते. काँग्रेसमध्ये दोन गट आहेत. एक सोनिया गांधी यांचा आणि दुसरा राहुल गांधी यांचा गट त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यावरही टीका केली होती.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती