कॉंग्रेस आघाडी करण्याच्या लायकीचा पक्ष नाही, कुमारस्वामी यांची टीका

कर्नाटकात यापूर्वी कॉंग्रेससोबत आघाडी करून पस्तावलेले जनता दलाचे (सेक्युलर) नेते आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी कॉंग्रेस आघाडी करण्याच्या लायकीचा पक्ष नसल्याची टीका केली आहे. 2018 मध्ये आम्ही त्यांच्याकडे गेलो नव्हतो, कॉंग्रेसच आमच्या दारात आली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : कर्नाटकात यापूर्वी कॉंग्रेससोबत आघाडी करून पस्तावलेले जनता दलाचे (सेक्युलर) नेते आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी कॉंग्रेस हा आघाडी करण्याच्या लायकीचा पक्ष नसल्याची टीका केली आहे. त्यामुळे कर्नाटकात नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेससोबत आघाडी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कर्नाटकात ३ नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी कॉंग्रेसबरोबर आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट करताना कुमारस्वामी म्हणाले, कॉंग्रेस आघाडी धर्माचे पालन करत नाही. त्यामुळे जनता दलाने आघाडीचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही.

आमच्यापैकी कोणीही कॉंग्रेसच्या दारात गेला नाही. २०१८ मध्ये कॉंग्रेसचे नेतेच आमच्या दारात आले होते. याचे कारण म्हणजे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या लोकप्रियतेचा फायदा कॉंग्रेसला घ्यायचा होता.

कुमारस्वामी म्हणाले, कर्नाटकातील त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार कॉंग्रेसने पाडले होते. त्यातूनच त्यांना आघाडी धर्माशी काहीही देणेघेणे नाही. शिवाय या पक्षामध्ये सगळ्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असतात. त्यांच्यात एकत्र राहण्याची क्षमता नाही. त्यामुळे जनता दल कधीही कॉंग्रेसशी आघाडी करणार नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*