आभाळ फाटलं, लाखोंचं नुकसान झालं; अन् मुख्यमंत्र्यांनी दिले 3,800 फक्त!!

  • शेतकरी संतप्त; ठाकरे – पवार सरकार कडून हा दिलासा की जखमेवर मीठ?

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतक-यांना बसला आहे, अतिवृष्टीमुळे अनेकांच्या शेतजमिनीत पाणी शिरले, पुरामुळे जनावरांचा चारा वाहून गेला, घरं कोसळली, शेतक-यांवर डोंगराएवढं संकट कोसळलं, यात शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालं.

त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोलापूरच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या हाती फक्त 3800 रुपयांचा मदतीचा चेक ठेवला. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणे ऐवजी व त्यांचे अश्रू पुसणे ऐवजी शेतकऱ्यांच्या जखमी वरच मीठ चोळण्याची भावना व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या दौ-यात काही शेतक-यांना मदतीसाठी धनादेशाचे वाटप करण्यात आले होते. पावसामुळे शेतक-यांचे सर्वकाही हिरावून घेतलंय, सोलापूरच्या रामपूरमध्ये नुकसानग्रस्त शेतक-यांच्या हाती केवळ ३ हजार ८०० रुपयांचा धनादेश दिला आहे. लहान लेकरं उपाशी बसलीत, धान्य वाहून गेले आहे, ३-४ लाखांचे नुकसान झालंय, एवढा तरी चेक कशाला दिलाय? तुमचा चेक घेऊन जा अशा शब्दांत शेतक-यांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*