अपयश झाकण्यासाठी भुजबळांचा कांगावा,म्हणाले, मंदीरापेक्षा कांद्यासाठी भांडा


विशेष प्रतिनिधी

नाशिक : आपले अपयश झाकण्यासाठी कोण कशापध्दतीने प्रयत्न करेल,कुठल्या गोष्टींचा आधार घेईल, हे कुणीच सांगू शकत नाही, नाकर्ते पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना आता हिंदुचे उणेदुणे काढण्याची हौस आली आहे.

राज्यातील मंदिरे भाविकांना खुले करण्यासाठी हिंदु संघटना,पदाधिकारी एकवटले असतांना भुजबळांना या सर्वांना ज्ञानाचे डोस पाजत आपण मंदीरापेक्षा गाजत असलेल्या कांद्याच्या प्रश्नी भांडा असा सल्ला देत कांगावा करण्यास सुरवात केली आहे.

पण यातून जागोजागी अपयशी ठरत असलेल्या भुजबळांचा नाकर्तेपणा हटणार नाही हे मात्र नक्की जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याचा प्रश्न,आरोग्य यंत्रणेचे वाजलेले तीन तेरा,ग्रामसभेतून कार्यकर्त्यांची नियुक्ती,भाजीपाल्याचे वाढलेले दर, युवकांची नोकऱ्यांतील कुंचबणा शेतकऱ्यांचा खतांसह इतर किंमती असे नाशिक जिल्ह्यातील कितीतरी प्रश्न आ वासून उभे आहेत. मात्र भुजबळांनी त्याचे देणं घेणं नाही, ते आपल्या स्वतःतच मशगुल आहेत. एखादा प्रश्न उभा राहिला की मग त्या ज्ञानाचे डोस देण्यासाठी पुढे येतात आणि एखाद्या समाजाला टार्गेट करतात त्याचे हे काही नवे नाही.


राज्यात मुलभूत सुविधां देणाऱ्या व्यवसायांसह दारूची दुकाने खुली झाली,रेस्टारंट,सिनेमागृह,जिम आता खुले झाली आहे, बस आणि लोकलसेवाही हळूहळू पूर्ववत होऊ लागली आहे. मात्र महाआघाडीच्या सरकारला भाविकांच्या मंदीराविषयी काही देणे घेणे नाही, मंदीरे खुले करण्यास त्यांना अडचण वाटत आहे. हेच लक्षात घेऊन आंदोलन करणाऱ्या हिंदु बांधवांची भुजबळांना थट्टाच वाटत आहे. ते म्हणतात मंदीरे उघडत नाही म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करा,अशी मागणी करून राजकारण करणाऱ्यांची किव येते, मंदीरे खुली करण्यासाठी आंदोलनाचे इशारे देणाऱ्यांनी कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होत असल्याने कांद्याच्या भावासाठी ही आंदोलने करावीत,असा टोला मारायला ते विसरले नाही.

वास्ताविक धार्मिक पौराणिक शहर म्हणून परिचित असलेल्या नाशिकसह त्र्यंबकेश्वर,वणी,शिर्डीचे देवस्थान खुले करायला हवे. या मंदीराच्या ठिकाणी येणाऱ्या भविकांवरच तेथील विक्रेते,व्यवसायिकांचा चरितार्थ अवलंबून आहे,  नाशिक जिल्हा कांद्याचे आगर म्हणून ओळखले जाते, त्यामुळे नाशिककरांसाठी कांद्याचा प्रश्न हा महत्वाचाच आहे, त्याकडे कुणीही दुर्लक्ष करू शकत नाही,पण त्यासाठी हिंदु मंदीराच्याप्रश्नी लढा देणाऱ्या भाविकांना डोस पाजणे हे चूकीचे वाटते. हिंदुबांधवही शेतकऱ्यांसाठीही रस्त्यावर उतरायला तयार आहेत, किंबहुना अनेकदा शेतकऱ्यांच्या बरोबरीने हिंदु बांधवांनी त्यांच्यासाठी संघर्ष केल्याची उदाहरणे आपल्याला माहिती आहे, मात्र अशापध्दतीने भुजबळांनी कांगावा करणे हे नक्कीच कुणाला न पटणारे आहे, हे मात्र प्रत्येकाने ध्यानात घ्यायला हवे.

धान्यांच्या तुटवड्याकडे लक्ष द्या

ऐन दिवाळीत धान्याचा जिल्ह्यात तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे, गोरगरीब धान्यांसाठी चकरा मारत आहे, मात्र त्यांना धान्य मिळत नाही, राज्य शासनाकडूनच पुरेसा पुरवठा झाला नाही तर तुम्हाला कसे देणार,असे व्यवसायिकांकडून सांगितले जात आहे, याकडे भुजबळांनी लक्ष देऊन राज्यातील व्यवस्थित धान्य पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करायला हवे, त्यापेक्षा त्यांना मंदीराच्या प्रश्न पेटविण्यास स्वारस्य वाटत आहे.असे वाटते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था