सीएएविरोधी आंदोलनातून केंद्राचे २० कोटींचे, तर रेल्वेचे ९० कोटींचे नुकसान

  • दिल्ली पोलिसांकडून आंदोलनाकडून वसुलीसठी नवे आरोपपत्र

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी(एनआरसी) विरोधात दिल्लीसह देशभरात झालेल्या आंदोलन, दंगलीमुळे केंद्र सरकारला जवळपास २० कोटींचा फटका बसला तर रेल्वेचे सर्वाधिक भरून न येणारे नुकसान झाले असून तो आकडा ९० कोटींच्या घरात पोहचला असल्याचे उघड झाले आहे. या नुकसानभरपाईबद्दल खऱ्या आंदोलकांविरोधात नवी दिल्ली पोलिसांनी नुकतेच नव्याने आरोपपत्र दाखल केले आहे.

सीएए आणि एनआरसीचा मुद्दयावर देशभर रान पेटल हे गृहितच होते, यात नवीन काही नव्हते. या कायद्यांना जवळपास थोड्याफार फरकाने सर्वच राज्यात विरोध झाला. विरोधाची सुरवात ही पूर्वीकडील राज्यामधून झाली. सगळ्यात जास्त विरोध प्रदर्शन हे आसाममध्ये दिसून आले होते. या विरोधाची धग त्यानंतर दिल्ली,उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालपर्यत पोहचली होती.

अनेकजणांना वाटते की या कायद्यांमुळे आपले नागरीकत्व तसेच सुरक्षितता धोक्यात येईल, काहींना वाटते की आसाममध्ये हे दोन्ही कायदे लागू केल्याने तेथील लोकांचे नागरीकत्व धोक्यात आले आहे त्यामुळे आपल्याबरोबरही असेच होईल,असे अनेकांना वाटले तर काही कारण नसतांनाही विरोधाला विरोध म्हणून या आंदोलनात अनेकजण सहभागी झाले होते. विरोधाला विरोध वाढत गेले आणि त्यातून देशभरात दंगली उसळल्या,रेल्वे डबे पेटवले,रूळाचे नुकसान केले, सरकारी कार्यालयातही जाळपोळ करत सरकारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. झाले.

दिल्लीच्या शाहीन बाग येथे सीएए व एनआरसी विरोधात १०१ दिवसांपासून आंजोलन सुरु होते. दिल्ली पोलिसांनी कोरोनाचे कारण देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. पण पोलिसांना विरोध करणाऱ्या ६ महिला आणि 3 पुरुषांना ताब्यात घेतले होते. नवी दिल्ली,उत्तर प्रदेश,पश्चिम बंगाल,आसाम आणि महाराष्ट्रासारख्या राज्यातही हे आंदोलन खूप पेटले, त्यातून मोठे नुकसान झाले.

या नुकसान भरपाई प्रकरणी काही दिवसांपुर्वी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, स्वराज अभियानाचे नेते योगेंद्र यादव यांच्यासह इतर काही सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर काही दिवसांनी दिल्ली पोलिसांनी खंडन केले आहे. या प्रकरणावर राजकारण सुरू झाले होते. या पूर्वी, दिल्ली दंगल प्रकरणी सीताराम येचुरी, अर्थतज्ज्ञ जयंती घोष, दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक आणि कार्यकर्ते अपूर्वानंद, लघुपट निर्माते राहुल रॉय यांची नावे दंगलीचा कट रचल्याच्या आरोपामुळे पुरक आरोपपत्रात दाखल करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

या उसळलेल्या घटनेमुळे सरकारचे जवळपास वीस कोटीचे नुकसान झाले, रेल्वेलाही मोठा फटका बसला तर ५१ लोकांना आपले प्राण गमवावे लागले हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. या प्रकरणी पोलिस आता आक्रमक झाले असून त्यांनी सरकारला नुकसान पोहचविणाऱ्यांविरोधात नवे दोषारोषपत्र दाखल करत आपली कारवाई सुरु केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*