सीमारेषेवर भारतच चीनपेक्षा वरचढ, राफेलमुळे वाढली ताकद, हवाईदल प्रमुखांचा विश्वास

सीमारेषेवर कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी चीनला भारतावर वर्चस्व मिळवता येणारच नाही, असा विश्वास वायूदल प्रमुख आरकेएस भदोरिया यांनी व्यक्त केला. राफेल विमानांमुळे हवाई दलाची ताकद वाढल्याचेही त्यांनी सांगितले.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सीमारेषेवर कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी चीनला भारतावर वर्चस्व मिळवता येणारच नाही, असा विश्वास वायूदल प्रमुख आरकेएस भदोरिया यांनी व्यक्त केला. राफेल विमानांमुळे हवाई दलाची ताकद वाढल्याचेही त्यांनी सांगितले.
वायूदल दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भदौरिया म्हणाले की, आपल्या शेजारच्या आणि त्यापलीकडच्या प्रदेशात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असली तरी भारत कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. एकाच वेळी दोन आघाड्यांवर युद्ध लढण्यासाठी आपला देश सक्षम आहे. लडाखमध्ये भारतीय सैन्य अगदी मोक्याच्या जागेवर तैनात आहे. त्यामुळे चीनच्या बाजूने कोणताही धोका उत्पन्न झाल्यास भारतीय लष्कर त्याला सक्षमपणे तोंड देऊ शकते.
चिनी हवाईदलाने कितीही ताकद लावली तरी ती भारताच्या क्षमतेपुढे अपुरी पडेल. मात्र, आम्ही शत्रूला कमी लेखण्याची चूक करणार नाही. लष्कराच्या जवानांना लवकरात लवकर सीमेवर पोहचवण्याचं काम हवाईदलानं पार पाडलं. आम्ही आमच्या क्षमता विस्तारण्याचा प्रयत्न केलाय. राफेल आल्यामुळे आमची ताकदही वाढली आहे. तीन वर्षात राफेल आणि तेजस टीमची संपूर्ण क्षमता वापरात येईल.
चीनच्या सीमावादावर बोलताना भदौरिया यांनी सांगितले की, आम्ही कोणत्याही आव्हानासाठी सज्ज आहोत. टू फ्रंट वॉरसाठीही आणि पारंपरिक युद्धासाठीही आम्ही तयार आहोत. चीनच्या तुलनेत लडाखमध्ये नाही तर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी इतर ऑपरेशनल भागात जवानांना तैनात करण्यात आलेलं आहे. कोविड दरम्यानही आम्ही एअरक्राफ्ट ऑपरेशनल ठेवलं होते.
महिलांबद्दल कौतुक करताना भदौरिया यांनी महिलांना जितक्या शक्य आहेत तितक्या भूमिकेत जबाबदाऱ्या देण्यात आल्याचे सांगितले. आता पुढच्या वाटचालीबद्दल विचार करावा लागेल. मे महिन्यात चीनच्या मनसुब्यांची कल्पना आल्यानंतर आम्ही लगेचच त्याला प्रत्यूत्तर दिलं. सेनेनंही ज्या गरजेच्या गोष्टी होत्या त्या लगेचच तैनात केल्या. पूर्वोत्तर भागात वायुसेनेची उपस्थिती आहे.
सुखोई अगोदरपासूनच आहे, आता राफेलही लवकरच येईल. जर काही झालं तर आम्ही मजबुतीनं त्यावर प्रतिक्रिया देऊ शकू. आम्ही सध्या ८३ तेजसवर लक्ष केंद्रीत करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*