बिहार जिंकणारच, प्रभारीपदी नियुक्ती होताच देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाकडून बिहारच्या प्रभारीपदी अधिकृतरित्या नियुक्ती करण्यात आली आहे. भूपेंद्र यादव यांनी फडणवीसांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.


विशेष प्रतिनिधी

पाटणा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाकडून बिहारच्या प्रभारीपदी अधिकृतरित्या नियुक्ती करण्यात आली आहे. भूपेंद्र यादव यांनी फडणवीसांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.

भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस तसंच बी. एल. संतोष यांच्यासोबत बिहारच्या प्रमुख भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीस यांना अधिकृतरित्या बिहारच्या प्रभारीपदी नेमण्यात आलं.

देवेंद्र फडणवीस यांची अधिकृतरित्या बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती होताच त्यांनी बिहार जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. त्या जबाबदारीला निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न करेन. यंदाच्या निवडणुकीत एनडीए बहुमताने जिंकेल. संपूर्ण ताकदीने निवडणूक लढवू आणि जिंकू’, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिनाभरापासूनच बिहारचे दौरे सुरू केले आहेत. त्यांच्याकडे पक्षाने यापूर्वीच निवडणुकीची जबाबदारी सोपविली होती. त्याची अधिकृत घोेषणा आज करण्यात आली.

अभ्यासू नेते असलेल्या फडणवीस यांना बेरजेचं राजकारण करण्याचा अनुभव आहे. राज्यात भाजपा जदयु, लोजपा तसेच हिंदुस्थान अवाम मोचार्सोबत युती करीत निवडणूक लढवत आहे. निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस आता अधिकृतपणे मित्रपक्षांसोबत जागावाटपाच्या चर्चेत सहभागी होऊ शकतील.

त्याचबरोबर निवडणूक हायटेक पध्दतीने लढविण्यासाठीही ते ओळखले जातात. त्यामुळे त्यांना बिहारमध्ये जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे.
बिहार विधानसभेच्या निवडणुका तीन टप्प्यांत होणार आहेत. पहिल्या टप्प्याचे मतदान २८ आॅक्टोबर, दुसºया टप्प्याचे मतदान ३ नोव्हेंबर आणि तिसºया टप्प्याचे मतदान ७ नोव्हेंबरला होणार असून १० नोव्हेंबरला बिहारचा निकाल स्पष्ट होणार आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*