नितीश कुमारांना शेवटची निवडणूक हात “देणार” की हात “दाखवणार?”


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली  : बिहारमध्ये उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर होणार आहे. साधारणपणे दुपारी ३ वाजेपर्यंत बिहारचे चित्र स्पष्ट झालेले असेल. उद्याच्या निकालाचा प्रभाव बिहारसह देशाच्या राजकारणावर पडणार आहे. बिहारच्या यंदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. bihar election news घराणेशाही लोक स्विकारतात की नाही यावर चिराग पासवान आणि तेजस्वी यादव यांचे पुढील भवितव्य ठरेल.

त्याचप्रमाणे नितीश कुमारांची ‘सुशासनबाबू’ ही प्रतिमा कितपत मजबूत आहे, याचेही उत्तर मिळेल. सर्वांत महत्वाचे म्हणजे या सर्वं पक्षांना मिळणारे यश एका बाजुला आणि भाजपाला मिळणारे यश एका बाजुला असेल. कारण कदाचित आणखी पाच वर्षांनी भाजपा बिहारमध्ये प्रमुख पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. त्यामुळे आता १० नोव्हेंबरपर्यंत सर्वांची उत्कंठा ताणली जाणार आहे.

यंदाची बिहार विधानसभेची निवडणूक अनेक विषयांवर वैशिष्ट्यपूर्ण ठरली. कोरोना संसर्गाच्या काळात होणारी ही पहिलीच निवडणूक होती. प्रत्येक टप्प्यासाठीचे सोशल डिस्टन्सिंग, प्रचारासाठी ऑनलाईन पद्धतीवर भर, सुरूवातीला नितीश कुमारांसाठी एकतर्फी वाटणारी मात्र अखेरच्या टप्प्यात तेजस्वी यादव यांना मिळालेला अनपेक्षित प्रतिसाद, चिराग पासवान यांची कथित बंडखोरी, नितीश कुमार यांचे भावनिक आर्जव ही निवडणुकीची प्रमुख वैशिष्ट्य ठरली. bihar election news

यंदाची मुख्य लढत ही एनडीए आणि महाआघाडीमध्येच झाली आहे. दोन्ही आघाड्यांनी आपापल्या यशाविषयी पक्की खात्री आहेच, मात्र ऐनवेळी बंडखोरी करणाऱ्या चिराग पासवान यांच्या उमेदवारांना मिळणारी मते दोन्ही बाजुचे गणित बिघडवू शकतात.

प्रचारासाठी भाजपाने लहान – मोठ्या अशा तब्बल १ हजार सभा घेतल्या, त्यापैकी १२ सभा या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होत्या. त्याचप्रमाणे केंद्र आणि राज्य पातळीवरील भाजपाच्या २९ नेत्यांनी प्रचार केला. त्यापाठोपाठ ११३ सभा नितीश कुमारांच्या झाल्या, राहुल गांधीनी अवघ्या ८ सभा घेतल्या तर राजदच्या तेजस्वी यादव यांनी २५१ सभा घेतल्या. राजकीय सभांना मिळालेल्या प्रतिसादातून मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा अतिशय उत्साहाने भरलेल्या असल्याचे स्पष्ट जाणवले.

bihar election news

आपल्या नेहमीच्या जोशपूर्ण वातावरणाने पंतप्रधान मोदींच्या सभा पार पडल्या. त्याचप्रमाणे तेजस्वी यादव यांच्या सभाही जोरदार झाल्या असल्या तरी त्यात काहीसा ‘उन्माद’ जाणवत होता. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सभांचा रंग यावेळी काहीसा फिका पडल्याचे जाणवत होते. अगदी प्रचाराच्या अखेरच्या सभेत त्यांनी “ही माझी शेवटची निवडणूक आहे, अंत भला तो सब भला” अशी भावनिक सादही मतदारांना घातली. त्यामुळे यंदाची निवडणूक नितीश कुमारांसाठी अतिशय महत्वाची ठरणारी आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था