BabyPenguin थांबायलाच तयार नाही; समीत ठक्करवरील गुन्ह्यानंतर trend वाढला


समीतच्या ब्लॉगवर नरेंद्र मोदीही फॉलोअर


विशेष प्रतिनिधी 

मुंबई / नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना औरंगजेब आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना महंमद शाह आझम उर्फ बेबी पेंग्विन म्हणणाऱ्या समीत ठक्करवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर ट्विटरवर BabyPenguin हॅशटॅग जोरात ट्रेंड होतोय. आत्तापर्यंत १५ हजार जणांनी हे ट्विट केलय. समीत ठक्कर हा ब्लॉगर आहे. त्याच्या ४० हजार फॉलोअर्सपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यापैकी एक आहेत.

आधी औरंगजेब नंतर बेबी पेंग्विन यावरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे भडकलेत. उद्धव ठाकरे यांची तुलना मुघल सम्राट औरंगजेबाशी केल्यावर लगेच समीत ठक्कर विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पण त्यानंतरच ट्विटरवर BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड झाला तो अजून थांबायला तयार नाही.

“छत्रपती शिवाजी महाराज असोत की हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी सर्व महाराष्ट्राला प्रेरणा दिली. तुम्ही आधुनिक औरंगजेब आणि तुमचे पुत्र महंमद शाह आझम उर्फ बेबी पेंग्विन हे मला धाकदपडशहा दाखवू शकत नाहीत की घाबरवू शकत नाहीत.” असे आव्हानात्मक ट्विट समीत ठक्करने केले आहे.

त्याला सोशल मीडियातून जबरदस्त सपोर्ट मिळतोय. एवढेच नाही, तर समीतने उद्धव ठाकरे यांच्या २०१४ च्या भाषणाचा दाखलाच दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांना दिल्लीहून अफजल खानाच्या फौजा सुटल्यात अशी टीका केली होती. ती चालते का?, असा तिखट सवाल समीत ठक्करने केला आहे.

मूळ ट्विट समीतने १ जुलैला केले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. युवा सेनेचे कायदेशीर सल्लागार धर्मेंद्र मिश्रा यांनी समीर ठक्कर याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. पण यामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव चर्चेत का आहे असा प्रश्न अनेकांना पडला. मुंबईच्या जिजामाता बागेत पेंग्विन पक्षी आणून ठेवण्याचा वाद गाजला होता. आदित्य यांनी आग्रह धरून ते पक्षी बागेत आणून ठेवले होते. त्यानंतर त्यांना पेंग्विन या नावाने चिडवले जातेय.

धर्मेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीनंतर व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात बदनामीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून समीर ठक्करला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचा आदेश देण्यात आला. नागपूरचा रहिवासी असलेल्या समीर ठक्करने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावरही आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. तसेच सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते.

समीतच्या पाठीशी सोशल मीडियातून अनेक लोक पुढे आले आहेत. समीत ब्लॉगर आहे. त्याला ४० हजार फॉलोअर्स आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यापैकी एक आहेत.

नेटकऱ्यांनी पेंग्विनचे एम्परर, रॉयल, रॉकहॉपर पेंग्विन अशा जातींचे फोटोही टाकले आहेत, त्याच बरोबर आदित्यचा फोटो टाकून हा घराणेशाहीचा पेंग्विन अशी बोचरी टिपण्णी देखील केली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था