अयोध्येतील सोहळा समस्त भारतीयांचा; अडवानी, जोशींना निमंत्रण; मात्र कार्यक्रमावर भाजपची छाया नाही; मोदींच्या सूचनेनंतर महत्त्वपूर्ण निर्णय


अयोध्येतील राममंदिराचे भूमिपूजन समस्त भारतीयांसाठी गौरवशाली क्षण आहे. हा केवळ भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम नाही. त्यामुळे श्रीराम जन्मभूमी न्यासाने मोदी सरकारमधील एकाही केंद्रीय मंत्र्याला निमंत्रण दिलेले नाही. तसेच एकाही राजकीय पक्षाच्या नेत्याला या कार्यक्रमाला बोलाविले नाही. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही नाव निमंत्रितांच्या यादीत नाही. देशातील सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच सूचनेवरून हा निर्णय घेतला गेल्याचे बोलले जात आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अयोध्येतील राममंदिराचे भूमिपूजन समस्त भारतीयांसाठी गौरवशाली क्षण आहे. हा केवळ भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम नाही. त्यामुळे श्रीराम जन्मभूमी न्यासाने मोदी सरकारमधील एकाही केंद्रीय मंत्र्याला निमंत्रण दिलेले नाही. तसेच एकाही राजकीय पक्षाच्या नेत्याला या कार्यक्रमाला बोलाविले नाही. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही नाव निमंत्रितांच्या यादीत नाही. देशातील सामाजिक सौहार्द टिकविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच सूचनेवरून हा निर्णय घेतला गेल्याचे बोलले जात आहे.

रामजन्मभूमी आंदोलनातील महत्वाची भूमिका बजावणारे नेते लालकृष्ण अडवाणी व मुरलीमनोहर जोशी यांना मात्र या कार्यक्रमाचे निमंत्रण आहे. परंतु, देशातील चीनी व्हायरसच्या साथीच्या पार्श्वभूमीवर या दोन ज्येष्ठ नेत्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहायचे की नाही हा निर्णय याचा निर्णय त्यांनीच घ्यावा असे ट्रस्टने म्हटले आहे.

कार्यक्रमाचे स्वरूप धार्मिक असावे यावर श्रीरामजन्मभूमी न्यासाचा कटाक्ष आहे. हा न्यास एखाद्या विशिष्ट पक्षाच्या बाजूने झुकलेला आहे, असे चित्र निर्माण होऊ नये याची दक्षता घेण्यात येत आहे. त्यामुळेच अगदी भाजपच्या नेत्यांनाही या लांब ठेवण्यात आले आहे.


राममंदिर बांधण्यास मुस्लिमांसह अन्य धर्माच्या एकाही नेत्याने विरोध केला नाही ही आनंददायी घटना आहे. एआयएमआयएम या पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहू नये अशीच भूमिका घेतली आहे. राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाण्यासाठी सर्व धर्मांचे प्रतिनिधी तसेच सर्व मठांचे प्रमुख धर्मगुरू यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

निमंत्रितांमध्ये विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस मिलिंद परांडे, बजरंग दलाचे प्रमुख सुरेंद्र जैन व आणखी काही लोकांचा समावेश आहे. तसेच देशातील १३३ संत व महंतांना निमंत्रण देण्यात आले आहे.

राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, रामजन्मभूमी न्यासाचे प्रमुख नृत्यगोपाल दास, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल हे मान्यवर उपस्थित राहाणार आहेत

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती