व्हिएन्ना हल्ल्याचे जगभर पडसाद, सोशल मिडीयाद्वारे पाठिंबा


विशेष प्रतिनिधी

व्हिएन्नाः ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्याचा जगभरातील प्रमुखांनी निषेध नोंदवला आहे. ऑस्ट्रियाची पाठीशी उभे राहत दहशतवादाचा बिमोड करण्याचा निश्चिय या प्रमुखांनी सोशल मिडीयावर केलेल्या टिव्टद्वारे निषेध नोंदवून एकजूटीने लढण्याची ग्वाही दिली. austria attacks

या हल्ल्याबद्दल पोलिसांनी सांगितलं की, व्हिएन्नामधील प्रसिद्ध सिनेगॉग सीटेन्स्टासे सभास्थानाजवळ ही घटना घडली. याविषयी बोलताना यहुदी समुदायाचे नेते ऑस्कर डॉइश यांनी ट्वीट करून म्हटलं की, ‘गोळीबार रात्री आठ वाजता सुरू झाला त्यावेळी सभास्थान बंद करण्यात आले होते.’ austria attacks

क्रोनेन झिटुंग या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सिनेगॉगचा एक सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. गृह विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारावर ऑस्ट्रियाच्या माध्यमांनी एकाला अटक केल्याची माहिती दिली आहे. गोळीबारात किती हल्लेखोरांचा समावेश होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

फटाक्यासारखा आवाज अन् लोक सैरावैरा पळाले

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या फुटेजमध्ये गोळीबार सुरू असताना लोकं रस्त्यावर सैरावैरा धावताना दिसत होते. गोळीबार सुरू झाला तेव्हा घटनेचे साक्षीदार ख्रिस झाओ जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये होते.माध्यमांना माहिती देतांना त्यांनी सांगितले, “सुरुवातीला फटाक्यांसारखा आवाज आला. 20 – 30 वेळा आम्ही आवाज ऐकला आणि नंतर आमच्या लक्षात आले हा फटक्यांचा आवाज नसून गोळीबार आहे.austria-attacks

गोळी लागलेले जखमी पीडित रस्त्यावर विव्हळत असताना आम्ही पाहिले. रुग्णवाहिकांचा आवाज आणि धावाधाव आम्ही पाहिली.”
दहशतवादी हल्ल्याची तीव्रता पाहता पोलिसांनी स्थानिकांना परिसरात येण्यास मज्ज्व केला, तसंच सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास टाळवण्याचेही आवाहन केले. संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली. ऑस्ट्रियाच्या सीमा भागातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

हल्ल्यानंतरच्या प्रतिक्रिया

आपण सध्या कठीण काळातून जात आहोत, अशी प्रतिक्रिया कुर्झ यांनी ट्विटवरून दिली. त्यांनी म्हटलं, “या भयंकर दहशतवादी हल्ल्यातील दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. दहशतवादाला आम्ही मुळीच घाबरलेलो नाहीत.”

Austria-attacks

युरोपीय नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युरोपने ‘हार मानू नये’ असे म्हटले आहे.
“संध्याकाळी व्हिएन्नाच्या मध्यभागी झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध नोंदवतो. आम्ही त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. फ्रान्सनंतर आता आमच्या एका मित्रावर हल्ला केला जातो. हा आमचा युरोप आहे. ते कुणाला आव्हान देत आहेत हे आपल्या शत्रूंना माहीत असलं पाहिजे,” असंही त्यांनी म्हटलं.

गेल्या आठवड्यात फ्रासन्मधील नाईस शहरात एका चर्चमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यात तीन जण ठार झाले. मॅक्रॉन यांनी ‘इस्लामी दहशतवादी हल्ला’ असल्याचं म्हटलं होतं. युकेचे पंतप्रधान असेही म्हणाले की, ‘आम्ही ऑस्ट्रियाचे दुःखात सहभागी आहोत.’

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था