आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट, आशिष शेलार यांची टीका

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील विसंवादाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी जोदार टीका केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य या पिता-पुत्रांवर त्यांनी निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्र नगरी, चौपट राजा…आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट…’ असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील विसंवादाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी जोदार टीका केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य या पिता-पुत्रांवर त्यांनी निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्र नगरी, चौपट राजा…आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट…’ असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अशात मंदिरे उघडण्याची मागणी विरोधी पक्षाकडून सातत्याने केली जात आहे. दरम्यान बार, दारुची दुकाने उघण्यात आली मात्र धार्मिक स्थळे न उघडल्यामुळे राज्य सरकारवर प्रचंड टीका केली जात आहे. यावरुनच आशिष शेलारांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. प्राचीन दंतकथेतील आटपाट नगरीच्या कथेचा आधार घेत शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

आशिष शेलारांनी ट्विट केले की, ‘आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट…महाराष्ट्र नावाच्या समृद्ध राज्यात कोरोना सोबत पावसाने थैमान घातलेले…शेती, घरे, गुरे, सारे काही उध्वस्त..शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर अनावर… तेव्हा नगराचे राजे बॉलिवूड कसे वाचवायचे यावर चिंतातुर झालेले!

मदतीसाठी राजा येत नाही म्हणून देवाचा धावा करणारी जनता, आता मंदिरे तरी उघडा असा आर्जव करतेय…त्यावेळी नगरात कुणीही मागणी केली नसताना…पब,बार, रेस्टॉरंट रात्री 11.30 पर्यंत खुले ठेवून नाईट लाईफची काळजी राजपुत्र करीत आहेत. दुदैर्वी चित्र… महाराष्ट्र” नगरी आणि चौपट राजा!’

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*