आशियातला सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प देशाच्या सेवेत रूजू; मध्यप्रदेशातील रीवामध्ये उद्घाटन; ७५० मेगावॉटची क्षमता


  • मध्य प्रदेशाबरोबरच दिल्ली मेट्रोलाही वीजपुरवठा करणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आशियातला सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प आज देशाच्या सेवेत कार्यान्वित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याचे उद्घाटन केले. मध्य प्रदेशातील रीवामध्ये स्थापन करण्यात आलेल्या ७५० मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प त्यांनी देशाला समर्पित केला. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्रीही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. संपूर्ण मध्य प्रदेशासह दिल्ली मेट्रोलाही येथून वीज पुरविली जाईल.

रीवा सौरऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. ते म्हणाले, “आज रीवाने इतिहास रचला आहे. जेव्हा आम्ही आकाशातून टिपलेल्या या प्लांटचा व्हिडीओ पाहतो, त्यावेळी हजारो सोलार पॅनल शेतातल्या पिकांप्रमाणे डोलत आहेत, असे वाटते. रीवाचा सौरऊर्जा प्रकल्प या संपूर्ण क्षेत्राला ऊर्जेचे केंद्र बनणार आहे. यामुळे मध्यप्रदेशातील लोकांना लाभ मिळणार असून दिल्लीतील मेट्रोलाही वीज मिळणार आहे.”

मोदी म्हणाले, “आता रीवामधील नागरिक गर्वाने सांगतील की, दिल्लीतील मेट्रो आमचा रीवा चालवत आहे. याचा फायदा मध्यप्रदेशातील गरीब, मध्यम वर्गीय, शेतकरी आणि आदिवासी लोकांना होणार आहे. रीवाची ओळख आई नर्मदेमुळे आणि पांढऱ्या वाघांमुळे आहे.

आता रीवाचं नाव आशिया खंडातील सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाशी जोडले जात आहे. रीवाचा हा सोलार प्लांट या संपूर्ण क्षेत्राला या दशकातील सर्वात मोठे ऊर्जेचे केंद्र बनवण्यासाठी मदत करणार आहे. या प्रकल्पामुळे मध्यप्रदेशमधील उद्योगधद्यांसोबतच दिल्लीतील मेट्रोलाही फायदा होणार आहे.”

रीवामध्ये आशियातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प जिल्हा मुख्यालयातून २५ किलोमीटर दूर गुढमध्ये १९५० एकरमध्ये पसरला आहे. हा प्रकल्प रीवा अल्ट्रा मेगा सोलार लिमिटेड, एमपी ऊर्जा विकास लिमिटेड आणि भारताचे सौरऊर्जा निगम यांचा संयुक्त उपक्रम आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती