ठाकरे पवार सरकारच्या करंटेपणामुळे फॉक्सकॉनची गुंतवणूक तमिळनाडूत


  • अ‍ॅपल चीनमधून उत्पादन बंद करणार; फॉक्सकॉनची भारतात १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूकीची योजना
  • भारतात सहा हजार नोकऱ्या निर्माण होणार

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आयफोनची निर्मिती करणारी प्रसिद्ध अ‍ॅपल कंपनी हळूहळू चीनमधून आपले उत्पादन प्रकल्प दुसऱ्या देशांमध्ये शिफ्ट करत आहे. अ‍ॅपलशी संबंधित फॉक्सकॉन ही तैवानची कंपनी भारतात व्यवसाय विस्तार करण्याचा विचार करत आहे. चेन्नईजवळ श्री पेरुंबुदूर येथे कारखान्याचा विस्तार करण्याची फॉक्सकॉनची योजना आहे. आधी या व्यवसाय विस्ताराचा फायदा महाराष्ट्राला होणार होता. पण ठाकरे पवार सरकारच्या करंटेपणामुळे हे न घडता प्रकल्प तमिळनाडूत जाणार आहे.

भारतात १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे. यातील बहुतेक गुंतवणूक महाराष्ट्रात तळेगावजवळ होणार होती. पण राज्य सरकारने परवानगी दिली नाही. त्यामुळे फॉक्सकॉन कंपनी तमिळनाडूत जात आहे. अ‍ॅपल कंपनीसाठी आयफोनची जोडणी करण्याचे फॉक्सकॉम काम करते.

अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध आणि केरोना व्हायरसचे संकट यामुळे अ‍ॅपल चीनमधून आपले उत्पादन, व्यवसाय हळूहळू दुसऱ्या देशांमध्ये हलवत आहे. अ‍ॅपलने आपल्या क्लायंटसना चीनमधील उत्पादन प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची विनंती केली आहे. रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

ग्राहकांशी संबंधित असलेल्या विषयांवर आपण काहीही बोलणार नाही असे फॉक्सकॉनकडून सांगण्यात आले तर अ‍ॅपलने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अ‍ॅपलचा iPhone XR श्री पेरुंबुदूर येथील कारखान्यामध्ये बनवला जातो. तिथे गुंतवणूक करण्याची फॉक्सकॉनची योजना आहे. सध्या फॉक्सकॉन आयफोनचे बहुतांश मॉडेल्स चीनमध्ये बनवते. श्री पेरुंबुदूर येथील प्रकल्पाचा विस्तार झाल्यास सहा हजार नोकऱ्यांची निर्मिती होऊ शकते. आंध्र प्रदेशमध्येही फॉक्सकॉनचा प्रकल्प आहे. तिथे ते चीनच्या शाओमी कंपनीसाठी स्मार्टफोन बनवतात.

ठाकरे – पवार सरकारने गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर घालवली

फॉक्सकॉनची वर उल्लेख केलेली गुंतवणूक महाराष्ट्रात होणार होती. तसा कंपनीचा प्रस्ताव होता. तो मंजूर झाला असता तर तळेगावमध्ये ही गुंतवणूक येऊन महाराष्ट्रात रोजगार वाढ झाली असती. पण ठाकरे – पवार सरकारने तो प्रस्ताव नाकारला. त्यानंतर फोक्सकॉन कंपनीने तमिळनाडूत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती