अराजकता हा राष्ट्रीय जनता दलाचा डीएनए, जे. पी. नड्डा यांचा दावा


तेजस्वी यादव यांच्या सभांना नागरीक गर्दी करत असले तरी त्यांच्या पक्षाचा डीएनए काय आहे हे त्यांना माहित आहे. अराजकता हा त्यांच्या पक्षाचा डीएनए आहे. हे नागरिकांना ठाऊकच आहे, असा दावा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तेजस्वी यादव यांच्या सभांना नागरीक गर्दी करत असले तरी त्यांच्या पक्षाचा डीएनए काय आहे हे त्यांना माहित आहे. अराजकता हा त्यांच्या पक्षाचा डीएनए आहे. हे नागरिकांना ठाऊकच आहे, असा दावा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे.bihar election 2020

बिहारमधील निवडणूक प्रचार सभेत बोलताना नड्डा म्हणाले, “नागरिक तेजस्वी यादव यांच्या सभांना गर्दी करत असले तरी त्यांच्या पक्षाचा डीएनए अराजकता हा आहे. हे नागरिकांना ठाऊकच आहे. राजकारणात आपल्या चुका स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नका. आरजेडी अजूनही आपल्या चुकांना शक्ती समजते आणि आपण चूक केलीय हे ही त्यांना कुठेही जाणवत नाही. लालूजींनी केलेल्या कामाची त्यांना समज नाही, असं नड्डा म्हणाले.

बिहार निवडणुकीत एनडीएचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त करून नड्डा म्हणाले की, बिहारच्या जनतेला स्थिरता आणि विकास हवा आहे.नहे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि इथे नितीश कुमार यांच्या नेतृत्वातच होऊ शकतं. जनतेला नितीशजींचं पाठबळ हवे आहे.

bihar election 2020

बिहारमध्ये कोणतीही सरकारविरोधात नाराजी (अँटी इन्कंबेंसी) दिसत नाही. नागरिकांच्या अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्याची जबाबदारी नितीश कुमार यांची आहे. ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदी हे जग आणि देशातील सर्वात विश्वासू नेते आहेत. तसेच नितीश कुमार हे बिहारमधील सर्वात विश्वासू नेते आहेत. त्यांच्या कामातून हे स्पष्ट झालं आहे. आम्ही एकमेकांना पूरक आहोत.

तेजस्वी यादव यांच्यावर हल्ला चढविताना नड्डा म्हणाले की, तेजस्वी सध्या विरोधी पक्षनेते आहेत. २०१९ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांची उपस्थिती पाहा, करोनाचा काळात त्यांनी काय केलं पाहा, पुराच्या वेळचे काम पाहा. ते कोणालाही भेटत नाही. नितीशकुमार याचं काम बघा. सर्व प्रशासनाने चांगलं काम केलं आहे. त्यामुळेच परिस्थिती नियंत्रणात आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था