ममतांविरुध्द जनक्षोभ; सरकारची मृत्यूघंटा वाजल्याची शहांची टीका


विशेष प्रतिनिधी 
कोलकत्ता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारविरुद्ध जनक्षोभ उसळला असल्याची आपल्याला जाणीव झाली आहे. त्यांच्या सरकारची मृत्युघंटा वाजली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी  सांगितले. amit shah latest news
 
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. या वेळी बोलताना शोनार बांगलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात भाजपला सरकार स्थापनेची संधी द्या, अशी विनंतीही शहा यांनी जनतेला केली आहे.amit shah latest news
दोन दिवसांपासून आपण पश्चिम बंगालमध्ये आहोत आणि सरकारविरुद्ध जनक्षोभ असल्याची जाणीव आपल्याला झाली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच बदल घडू शकतो याची जाणीव जनतेला झाली असल्याचेही दिसून येत आहे.amit shah latest news
 
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शहा म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारच्या घटका भरल्या असून आगामी निवडणुकीत भाजप दोन तृतियांश बहुमतांनी सत्तेत येणार आहे.  ममता बॅनर्जी यांच्या अनेक निर्णयांविरुद्ध जनतेत रोष वाढत आहे. पश्चिम बंगालची जनता परिवर्तनाच्या आशेवर आहे.
 
 
 

amit shah latest news

 
 ‘लोकांच्या नजरेत पश्चिम बंगालमध्ये बदलाची आशा मला दिसतेय, हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शक्य आहे. केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिली जाणारी मदत राज्यातील ८० टक्क्यांहून अधिक लोकांपर्यंत पोहचणार नाहीत, याची काळजी ममता बॅनर्जी घेत आहेत.amit shah latest news
 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था