अजितदादांच्या दालनातील बैठकीत संभाजीराजेंना बोलूच दिले नाही, बैठक मध्येच संपवली : धनंजय जाधव


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सारथी संस्थेसंदर्भात मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचा पुरता विचका झाला. खासदार छत्रपती संभाजीराजे यांना सभागृहात खाली तिसऱ्या रांगेत बसवण्यात आल्याने मराठा समन्वयक आक्रमक झाले. त्यानंतर उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या दालनात दुसरी बैठक झाली. तेथे अजित पवारांच्या बाजूला संभाजीराजे बसले होते. पण बैठकीत संभाजीराजेंना बोलू दिले नाही, बैठक मध्येच संपवली, असा आरोप धनंजय जाधव यांनी केला.

धनंजय जाधव म्हणाले, “सारथीचा अहवाल प्रकाशित केला पाहिजे. उपमुख्यमंत्री अजितदादांना पूर्वीच्या समितीचा अहवाल प्रकाशित करण्यास सांगितले. पण दादांनी सांगितले की तो अहवाल नाही आता दुसरा अहवाल येतोय. पहिल्या अहवालात काही चुकीच्या गोष्टी असतील तर ते उघड करा. विजय वडेट्टीवार म्हणाले होते की, पूर्वीच्या अहवालावर आमचेच काही मंत्री नाखूश आहेत. म्हणजे यांच्यातच गोंधळ आहे.

मराठा समाजाला दावणीला बांधण्याचे काम महाआघाडी सरकार करत आहे. काही जणांनी मते मांडली. काही जणांचे बोलणे बाकी होतं. त्यानंतर संभाजीराजे बोलणार होते. पण त्याआधीच अजितदादांनी बैठकीतून काढता पाय घेतला. त्यामुळे बैठक विस्कळीत झाली.”

‘सारथी संदर्भातील अनेक गोष्टी अजून अंधातरीत आहेत. खुल्या बैठकीत अजितदादांनी सांगितले पाहिजे होते की, सारथीच्या बाबतीत त्यांनी काय पुढाकार घेतला आहे.’

संभाजीराजे यांना समाज वेगळ्या नजरेने पाहतो. पण त्यांना पूर्वीच्या बैठकीत ही अशीच वागणूक दिली आणि आजच्या बैठकीत ही असंच झालं. यापुढे भविष्यात संभाजीराजे मला नाही वाटत कुठल्या गोष्टीमध्ये आता हस्तक्षेप करतील. छत्रपत्री संभाजीराजेंना विश्वास देणारे शब्द पाळत नाहीत, असा आरोप देखील धनंजय जाधव यांनी यावेळी केला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था