अजित पवारांना व्हायचंय मराठा स्ट्रॉंगमन, सारथी पाठोपाठ अण्णासाहेब पाटील महामंडळही घेतले पंखाखाली


जातीय आधारावर मंत्र्यांवर विभागाची जबाबदारी देण्याची नवी पध्दत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सुरू केले आहे. याचाच भाग म्हणून अजित पवार यांनी सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ आपल्या पंखाखाली घेतले आहे. सारथीचे काम पूर्वी विजय वडेट्टीवार यांच्याकडे होते. मात्र आपण ओबीसी असल्यामुळे मराठा संघटना आपल्याला लक्ष्य करत असल्याची खंत वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली. ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनीही त्याला दुजोरा दिला. वडेट्टीवारांची अवस्था पाहून मुस्लिम असलेल्या नवाब मलिक यांनीही स्वतःहून अण्णासाहेब पाटील महामंडळाची सूत्रे पवारांकडे दिली. मराठा समाजासाठीच्या संस्था ताब्यात घेऊन मराठा स्ट्रॉंगमन होण्याची तयारी पवारांनी चालवल्याचे बोलले जाऊ लागले आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : जातीच्या आधारे मंत्र्यांना कामकाज वाटून देण्याची नवीच पद्धत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने सुरू केले आहे. याचाच भाग म्हणून अजित पवार यांनी मराठा समाजासाठी असलेले सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ आपल्या पंखाखाली घेतले आहे. मराठा स्ट्रॉंगमन होण्यासाठी या माध्यमातून अजित पवार यांनी तयारी सुरू केल्याची चर्चा यातून सुरु झाली आहे.

राज्यातील मराठा क्रांती मोर्चानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मराठा समाजाचे ध्रुवीकरण होऊन ही सगळी मते आपल्याकडे येतील असे राष्ट्रवादीला वाटत होते. परंतु, तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे वादळ शमविले. मराठा समाजच्या आरक्षणापासून ते सारथी संस्थेची स्थापना करण्यापर्यंत समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. त्यामुळे मराठा समाज राष्ट्रवादीच्या पाठीमागे उभा राहिला नाही.

राज्याचे उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद मिळाल्यानंतर अजित पवार यांनी त्या माध्यमातून मिळालेल्या ताकदीचा वापर सुरू केला आहे. मात्र, यामध्ये राज्यातील इतर मागासगर्वीय आणि अल्पंसख्यांक मंत्र्यांची चांगलीच कोंडीच झाली आहे. सारथीच्या निमित्ताने वाद उभा राहिला. त्यातून विजय वडेट्टीवार यांची बदनामी करण्यात आली. याचा फायदा उठवत अजित पवारांनी परिस्थितीचा ताबा घेतला.

मराठा संघटनांची बैठक बोलावली. या ठिकाणी मराठा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे वडेट्टीवार यांच्याकडून सारथीचा कारभार अजित पवार यांच्याकडे आला. त्यांनी तातडीने आठ कोटी रुपयांचा निधीही सारथीसाठी जाहीर केला. वास्तविक हा निधी अगोदरच दिला असता तर वाद उद्भवलाच नसता आणि वडेट्टीवार यांच्यावरही आरोप झाले नसते.

मराठा संघटनांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अखत्यारीतील मराठा समाजाच्या उद्योजकता वाढीसाठी कार्यरत अण्णासाहेब पाटील विकास महामंडळही अजित पवार यांनी ताब्यात घेतले आहे. पूर्वी नवाब मलिक यांच्याकडे हा कार्यभार होता. मात्र, वडेट्टीवारांची जी अवस्था झाली ती पाहून मलिक यांनी स्वत:हूनच या महामंडळाचा कार्यभार अजित पवार यांच्याकडे सोपविण्याची तयारी दाखविली आहे. अजित पवार यांच्याकडे असलेल्या नियोजन विभागाच्या अखत्यारित दोन्ही संस्था सामील होतील.

ओबीसी वडेट्टीवार आणि मुस्लिम नबाब मलिक यांच्या ताब्यातून मराठा अजित पवारांनी या संस्था काबीज केल्या आहेत. मात्र, हा चकीचा पायंडा असल्याची टीका विरोधकांबरोबरच सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही होत आहे. एखादा मंत्री अमूक जातीचा म्हणून त्याच्याकडून संबंधित जातीसाठी काम केले जाणार नाही, हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडत आहे, असे बोलले जात आहे. आता जातीच्या विकासासाठी स्थापन केलेल्या सगळ्याच महामंडळाची सूत्रे संबंधित जातीच्या मंत्र्यांना दिली जाणार का, असा सवाल केला जात आहे

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती