२ सप्टेंबरपासून राज्यातील मशिदी उघडणार; ठाकरे-पवार सरकारला इम्तियाज जलील यांचे आव्हान

  • “सरकारने परवानगी दिली नाही तरी मशिदी उघडणार”

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : ठाकरे – पवार सरकारने परवानगी दिली नाही तरी २ सप्टेंबरपासून मशिदी उघडण्याची धमकी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यापासूनच राज्यातील प्रार्थनास्थळे बंद आहेत.

इतर गोष्टींवरील निर्बंध कमी होत असताना प्रार्थनास्थळे पुन्हा उघडण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी वारंवार होत आहे. याच दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारने विरोध केला तरी २ सप्टेंबरपासून राज्यातील मशिदी उघडणार असल्याची धमकी दिली आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, “आम्ही आमच्या वतीने अल्टिमेटम देत आहोत. १ तारखेला गणपती विसर्जन आहे. हिंदू बांधवांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. १ तारखेपासून सगळी मंदिरे उघडा आणि २ तारखेपासून आम्ही आमच्या सगळ्या मशिदी उघडणार आहोत.

काही योग्य तर्क असतील तर ऐकू अन्यथा परवानगी दिली नाही तरी २ तारखेपासून सर्व मशिदी उघडू हे सरकारमधील लोकांना मला सांगायचं आहे.” हे आव्हानच इम्तियाज जलील यांनी दिले आहे. यावेळी त्यांनी मशिदी उघडण्याची सुरुवात आपणच औरंगाबादमधून करणार असल्याचेही सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*