हनी ट्रॅप फेम गुंड साहिल सैय्यदचा बेकायदा बंगला जमीनदोस्त

  • स्वयंघोषित विदर्भ डॉन संतोष आंबेकरच्या बंगल्यानंतर लागला साहिलच्या बंगल्याचा “नंबर”

विशेष प्रतिनिधी

नागपूर : भाजपच्या नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकण्याच्या प्रकरणाचा मुख्य आरोपी साहिल सय्यदचा बेकायदा अलिशान बंगला पाडण्याची कारवाई सुरू झाली आहे. नागपूर महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तरित्या साहिल सय्यदचा बगदादिया कॉलनीतील आलिशान बंगला पाडण्यास सुरुवात केली आहे. साहिल सय्यदने बगदादिया कॉलनीमध्येच एका धार्मिक स्थळाची तब्बल १६ एकर जागा बळकावली होती. तिथे स्वतःचा बंगला बांधत उर्वरित जागा 288 प्लॉट पाडून नियमबाह्य पद्धतीने विकली होती.

काही दिवसांपूर्वी नागपूरच्या भाजप नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवा, अशी ऑडिओ क्लिप झाली होती. त्यातील एक आवाज साहिल सय्यदचा असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. पोलिसांनी साहिल सय्यदवर एक गुन्हा नोंदवल्यानंतर एकानंतर एक गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. जमीन बाळकावणे, घरावर कब्जा करणे, खंडणी मागणे, फसवणूक करणे असे गुन्हे दाखल झाल्यानंतर साहिल सय्यदला अटक झाली होती.

सामान्यांची जमीन बळकावणाऱ्या गुंडाला धडा शिकवण्यासाठी नागपूर महापालिका आणि पोलिसांनी कंबर कसली आणि आज त्याचा आलिशान बंगला पाडायला सुरुवात केली आहे. याआधी कुख्यात गुंड संतोष आंबेकरचा बंगला पाडून नागपूरकारांच्या मनातील गुंडांची भीती कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे डीसीपी गजानन राजमाने यांनी या प्रकरणात ही महत्त्वाची भूमिका बजावली आणि आणखी एका गुंडांचा बंगला भुईसपाट करून दाखवला आहे हे विशेष.

यापूर्वी विदर्भाचा स्वयंघोषित डॉन गँगस्टर संतोष आंबेकरच्या नागपुरातील अनधिकृत बंगल्यावर पालिकेचा हातोडा पडला. यासाठी मोठा पोलीस फौजफाटा ही तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या ठोस पाठपुराव्यानंतर महापालिकेने कारवाई केली आहे. पोलीस उपायुक्त राजमाने आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची खास भूमिका आहे. इतवारी परिसरात संतोष आंबेकर याचा प्रशस्त आणि जयपुरी गुलाबी दगडाने सजवलेला कोट्यवधींचा बंगला होता. त्याने अनेक गुन्हे याच ठिकाणी केल्याची चर्चा आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*