स्वातंत्र्याच्या तीर्थक्षेत्राला पंतप्रधानांची अनोखी भेट


  • चेन्नई ते पोर्ट ब्लेअर २३०० किलोमीटर समुद्राखालून केबल; कनेक्टीव्हीटी वाढणार
  • बीएसएनएलच्या प्रकल्पाचे नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह हजारो क्रांतिकारकारकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंदमान – निकोबारच्या स्वातंत्र्याच्या तीर्थक्षेत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनापूर्वी अनोखी भेट दिली आहे.

केंद्र सरकारने अंदमान – निकोबार येथे सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल टाकली आहे त्याद्वारे संपूर्ण बेटावर फोन-इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. हा प्रकल्प बीएसएनएलमार्फत पूर्ण झाला असून केबल समुद्राखालून टाकण्यात आली आहे. याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.

आता हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर अंदमान निकोबारला प्रति सेकंद ४०० जीबी पर्यंत वेग मिळेल. चेन्नई ते पोर्ट ब्लेअर पर्यंत समुद्राखालून २३१३ किलोमीटर केबल टाकण्यात आली आहे. यासाठी एकूण 1224 कोटींचा खर्च आला असून ही केबल स्वराज बेट, लिटिल अंदमान, कार निकोबार, कामोरोता, ग्रेट निकोबार, लाँग आयलँड, येथपर्यंत जाईल.

यामुळे पोर्ट ब्लेअरला प्रति सेकंद ४०० जीबी पर्यंत आणि इतर बेटांवर २०० जीबी प्रति सेकंदाची गती मिळू शकते. बीएसएनएलने हा प्रकल्प पूर्ण केला असून २४ महिन्यांच्या आत समुद्रात केबल टाकली गेली आहे.

येथे सुरुवातीला बीएसएनएलचे नेटवर्क कार्य करेल, परंतु नंतर खासगी कंपन्यांना संधी मिळेल. अशा परिस्थितीत अंदमानला ४ जी सेवा देखील उपलब्ध होईल. या प्रकल्पाच्या सहाय्याने टेलि-एज्युकेशन, टेलि-हेल्थ, ई-गव्हर्नन्स, टुरिझम या क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये सुरू केला होता. आज त्यांनी त्याचे उद्घाटन केले.

पंतप्रधान म्हणाले, “१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन साजरा करण्यापूर्वी अंदमानच्या लोकांना ही भेट आहे. आता जेव्हा लोक तिथे येतात तेव्हा ते बराच काळ थांबण्याचा प्रयत्न करतील कारण तेथे आता कनेक्टिव्हिटीची समस्या उद्भवणार नाही. तसेच पर्यटनाला चालना मिळेल. लवकरच पोर्ट ब्लेअरला जवळच्या इतर बेटांशी जोडण्यासाठी जलवाहिनी तयार केली जाईल, नद्यांना जोडून देशात यावर काम सुरू आहे.”

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था