सर्व पक्षीय बैठकीत काँग्रेस आणि डावे पडले एकटे


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत – चीन सीमाप्रश्नी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सर्व राजकीय पक्षांनी देशहिताला प्राधान्य देत मोदी सरकारसोबत उभे असल्याची ग्वाही दिली. मात्र, काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी पुन्हा एकदा आपला वेगळाच अजेंडा पुढे रेटला. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या भूमिकेविषयी मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

भारत – चीन सीमाप्रश्नी केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. त्यात भारताच्या सीमेत कोणाचेही आक्रमण झालेले नाही. त्याचप्रमाणे भारताच्या एक इंच भूभागाकडेही कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. त्याचप्रमाणे बैठकीत सहभागी सर्व राजकीय पक्षांनी राजकीय मतभेद बाजुला ठेवून चीनचा एकमुखाने निषेध केला आणि केंद्र सरकारसोबत उभे असल्याचे सांगितले.


भारत मजबूर नव्हे, मजबूत आहे- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट भूमिका घेतला. भारताला निश्चितच शांतता हवी आहे, मात्र याचा अर्थ आम्ही कमजोर आहोत असा होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आम्ही ठामपणे उभे आहोत. भारत आता मजबूर नाही तर मजबूत आहे, असे ते म्हणाले. त्यांचा हा रोख माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि त्यांच्या सरकारच्या बोटचेप्या भूमिकेकडे होता. यानिमित्ताने काँग्रेससोबत सत्तेत असले तरीही उध्दव ठाकरे यांच्यातील शिवसैनिक जीवंत असल्याचे समजले.


काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी मात्र नेहमीप्रमाणे अनाकलनीय भूमिका घेत राष्ट्रहितास बाजुला सारल्याचे चित्र दिसले. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजकीय सभेप्रमाणेच मोदी सरकारवर केवळ प्रश्नांची सरबत्ती करण्यात आणि आरोप करण्यात धन्यता मानली.

दुसरीकडे कम्युनिस्ट पक्षांचे नेते डी. राजा आणि सीताराम येचुरी यांनी कम्यनिस्ट चीनचा स्पष्ट शब्दात निषेध करण्याऐवजी या प्रकरणात अमेरिकेचा हात असल्याचा जावईशोधही लावला. त्यामुळे एकीकडे संपूर्ण देश चीनविरोधात असताना काँग्रेस आणि डाव्यांनी पुन्हा एकदा आपले मूळ रुप दाखवून दिले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था