संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेची कटिबद्ध फक्त कागदापुरती नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही

  • शस्त्रास्त्र कारखाने सरकारी खाक्याने चालविल्याने मोठे नुकसान

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रात सुविधांची निर्मिती करण्यात आत्मनिर्भर होण्याची आमची कटिबद्धता फक्त चर्चा किंवा कागदपत्रांपुरती मर्यादित नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. नरेंद्र मोदी सुरक्षा परिषदेत बोलत होते.

मोदी म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्राला विकसित करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. भारतातच उत्पादव वाढावे, नवे तंत्र भारतात विकसित व्हावे आणि खासगी क्षेत्राचाही या क्षेत्रात जास्तीत जास्त विस्तार व्हावा हे आमचे मुख्य लक्ष्य आहे. यासाठी अनेक महत्त्वाची पाऊले उचलण्यात आली आहेत.”

गेल्या कित्येक वर्षांपासून शस्त्रांच्या कारखान्यांना सरकारी विभागाप्रमाणे चालवले जात होते, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली. “एका मर्यादित दृष्टीकोनामुळे देशाचे नुकसान तर झाले आहेच. याशिवाय तिथे काम करणाऱ्या मेहनती, अनुभवी आणि कुशल कामगारांचेही मोठे नुकसान झाले आहे,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*