संजय राऊत यांंच्यावर सोशल मीडियात रोखठोक पडी, सामान्यांनी व्यक्त केला संताप

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सामान्यांकडूनही संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियात त्यांच्यावर अनेकांनी रोखठोक पडी घेतल्याचे चित्र आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सामान्यांकडूनही संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियात त्यांच्यावर अनेकांनी रोखठोक पडी घेतल्याचे चित्र आहे.

सामना दैनिकातील आपल्या रोखठोक सदराच्या माध्यमातून संजय राऊत लोकांना ज्ञान शिकवित असतात. परंतु, सामान्य माणूसही त्यांच्याइतकाच रोखठोक होऊ शकतो, असा इशारा त्यांना सोशल मीडियातून देण्यात आला आहे. यानिमित्ताने अनेकांच्या प्रतिभेलाही बहार आला असून राऊत यांच्यावर टीकेचे बॉँबगोळे पडत आहेत.

‘नासाला काय कळतंय, आम्हाला विचारा, आम्ही दिवाळीत त्यांच्यापेक्षा जास्त रॉकेट सोडतो’, डॉक्टरर्स ब्रॅँडी, इंट्रोड्युस इन प्रिमीयम ब्रॅँड, कम्पाऊंडर ब्रॅँडी’, शाळेत पण शिपाई शिकवित होते मला’ असे मेसेज सध्या फिरत आहेत. डॉ. काशीनाथ घाणेकर, डॉ. श्रीराम लागू, डॉ. मोहन आगाशे आणि डॉ. अमोल कोल्हे यांचे फोटो टाकून कार्यक्षम कम्पाऊंडर न मिळाल्याने कार्यक्षेत्र बदललेले डॉक्टर असा मेसेज एकाने केला आहे.

‘आज मी माझ्या डेंटिस्टकडे गेलो होता. डॉक्टर तेथे होते पण कम्पाऊंडर सर आले नव्हेत. मी खूप वाट पाहिली. शेवटी डॉक्टरांकडूनच दाताचे काम करून घ्यावे लागले, काय होईल माहित नाही आता’ असे एकाने म्हटले आहे. ‘माझा विश्वास संपादकांवर नाही, पेपर टाकणाऱ्या पोऱ्यावर आहे, संपादकाला काय कळतं? असे म्हणून एकाने संजय राऊत यांच्या संपादकपदावर व्यंग केला आहे.

‘मुलाला बारावी विज्ञान शाखेत ९० टक्के मिळाल्यावर कम्पाऊंडर बनवा त्याला’ असा एक मेसेजही फिरत आहे. एकाने तर गुढघ्यावर मेंदूचे चित्र काढून संपादकांचा कम्पाऊंडरने काढलेला एक्स रे, असे म्हटले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*