“शेतकऱ्यांचे कैवारी जाणते राजे” दूधप्रश्नी गप्प का?; राधाकृष्ण विखेंचा खोचक सवाल

  • ठाकरे – पवार सरकारमधील मंत्र्यांचे दूधसंघ असल्याने भाव वाढवून देत नाही”

विशेष प्रतिनिधी

नगर : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढत असताना तिघाडी सरकारमध्ये प्रणेते “जाणते राजे” आणि शेतकर्यांचे ‘कैवारी’ बोलत का नाहीत?, असा खोचक सवाल माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. मनोली येथे संकल्प दूध संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी विखे पाटील बोलत होते.

यावेळी बोलताना विखे पाटील यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून ठाकरे – पवार सरकारवर जोरदार टीका केली. दूध दराचा विषय घेवून शेतकरी संघटना रोज सरकारला आंदोलनाचे इशारे देते पण त्यांचे आंदोलन कुठे दिसत नाही, असा टोला लगावून विखे पाटील म्हणाले की,ऊसाच्या भावासाठी आंदोलन करणारे शेतकरी संघटनेचे नेते दूध उत्पादकांच्या प्रश्नावर आक्रमक होत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

विखे पाटील यांनी सांगितले की,अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादकांना १० रूपये अनुदान द्या आणि प्रति लिटर ३० रुपये दर ठरवून द्यावा आशी मागणी करीत आहोत दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले पण ठाकरे – पवार सरकारने याकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष केले आहे कारण तिघाडी सरकार मधील मंत्र्यांचेच दूधसंघ असल्याने दर वाढवून देण्यासाठी त्यांचाच विरोध असल्याचे आता लपून राहिलेले नाही. दूध उत्पादकांना न्याय देण्यात आता मंत्र्यांचीच अडचण होत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

दूध उत्पादकांचे प्रश्न समजून घ्यायला सरकार मधील मंत्र्यांना वेळच नाही.त्यांचा संपूर्ण वेळ एकमेकांची समजूत काढून सरकार वाचविण्यासाठी चालाला आहे.एकाची समजूत काढली की दुसरा लांब जातो, ‘तुझ्या गळा माझ्या गळा’असा कारभार सध्या सरकारचा सुरू आहे कोणत्याही माळा गुंफा पण दूध उत्पादकांना न्याय न्याय द्या आशी मागणी करून विखे पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणारे जाणते राजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गप्प बसण्याची भूमिका कशी घेवू शकतात?

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*