शरद पवारांच्या पार्टनरकडून फ्लॅट खरेदी केला; खारच्या फ्लॅटवरून कंगनाचे थेट पवारांकडे बोट

  • जितेंद्र आव्हाडांचे गडबडीने कंगनाला परस्पर उत्तर
  • शरद पवार हे कंगना प्रकरण शमवयल गेले खरे पण कंगनाच्या खार परिसरात असलेल्या फ्लॅटवरून कंगनाने आता थेट शरद पवारांकडेच बोट दाखवले आहे. तिने शरद पवारांचे नाव घेऊन ट्विट केले तर त्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कंगनाला तिचे नाव न घेता उत्तर दिले.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कंगनाच्या खार परिसरात असलेल्या फ्लॅटवरून कंगना रनौतनं आता थेट शरद पवारांकडे बोट दाखवले आहे. यासंदर्भात तिने ट्विट केले असून त्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कंगनाला तिचे नाव न घेता उत्तर दिलं आहे. फ्लॅटचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने कंगना रनौतला नोटीस बजावली होती. या नोटिसमध्ये असे म्हटले होते, फ्लॅटमध्ये चुकीच्या पद्धतीने बदल करण्यात आले आहेत. यामध्ये नियमांचे उल्लंघन केले गेले आहे.

 

कंगनानं ट्वीट करत म्हटलं आहे की, महाराष्ट्र सरकारचे “पेड सोर्स” चुकीची माहिती पसरवत आहेत. बीएमसीने कालपर्यंत मला कधीही नोटीस पाठविली नाही. खरं तर सर्व कागदपत्रांच्या नूतनीकरणासाठी मी स्वत: सर्व कागदपत्रं बीएमसीला दिली होती. बीएमसीसमोर किमान आपल्या धैर्याने उभे राहण्याची ताकद माझ्यात आहे. आता खोटं का बोलत आहेत? असा सवाल कंगनानं ट्विटमधून केला आहे.

 

This was not just to me but to entire building and this is not my flat issue but a building issue which builder needs to deal with and this building belongs to Sharad Pawar we bought the flat from his partner so he is answerable for this not me..

— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020

 

 

हा फक्त माझाच नाही तर संपूर्ण इमारतीचा प्रश्न होता, केवळ माझ्या फ्लॅटचा इश्यू नाही. ज्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने सामोरे जाण्याची गरज आहे. ही इमारत शरद पवारांची आहे. आम्ही हा फ्लॅट त्यांच्या पार्टनरकडून खरेदी केला आहे. म्हणूनच ते यासाठी उत्तरदायी आहेत, असं तिनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कंगनाचं नाव न घेता टीका केली आहे. आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे की, शरद पवार यांनी महाराष्ट्र उभा केला, बांधला. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये. पण जिला महाराष्ट्राबाबत काहीच माहीत नाही ती म्हणते त्यांनी बिल्डिंग बांधली, असे आव्हाडांनी म्हटले आहे.

 

बीएमसीने कंगनाच्या कार्यालयातील बांधकाम पाडलं

 

काल मुंबईतील कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिका फिल्म्स’ कार्यालयातील बेकायदेशीर बांधकाम बीएमसीने पाडलं. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने यावर स्थगिती दिली. या प्रकरणी उद्या उच्च न्यायालय पुन्हा सुनावणी होणार आहे. कंगनाच्या कार्यालयात बेकायदा बांधकाम पाडण्यात घाई झाल्याबद्दल हायकोर्टाने बीएमसीना जाब विचारला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*