राहुल गांधींनी चीन प्रकरणात राजकारण करू नये; जखमी जवानांच्या वडिलांचे आवाहन


  • माझा मुलगा सैन्यातून लढला आणि पुढेही लढत राहील

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत – चीन हिंसक संघर्षात गालवन खोऱ्यात हुतात्मा झालेल्या २० जवानांच्या मृत्यूवरून राहुल गांधी यांनी राजकारण करू नये, असे कळकळीचे आवाहन या संघर्षातील जखमी जवानाच्या वडिलांनी केले आहे.

विरोधक मोदी सरकारवर प्रश्न विचारून टीका करत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्याने सरकारला प्रश्न विचारत आहेत. यावरूनच गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये जखमी झालेल्या जवानाच्या वडिलांनी राहुल गांधी यांना राजकारण न करण्याचे आवाहन केले आहे.

भारत – चीनच्या सैनिकांमध्ये गालवन खोऱ्यात संघर्ष झाला होता. यात भारताचे २० जवान हुतात्मा झाले. या संपूर्ण घटनाक्रमावर सरकारकडून सुरूवातीला कोणतेही भाष्य न करण्यात आल्याने प्रश्न उपस्थित केले गेले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदी यांना सीमेवर सुरू असलेल्या घडामोडींविषयी प्रश्न विचारले होते.

दरम्यान, या सगळ्या प्रकरणात गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या एका जवानाच्या वडिलांनी राहुल गांधी यांना राजकारण करण्याचं आवाहन केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं जवानाच्या वडिलांचा व्हिडीओ ट्विट केला आहे. “भारतीय लष्कर सक्षम असून, चीनचा पराभव करू शकते. राहुल गांधी यांनी यात राजकारण करू नये. माझा मुलगा लष्करात लढला  आणि यापुढेही लढत राहिल,” असे जखमी जवानाच्या वडिलांनी व्हिडीओत म्हटले आहे.

राहुल गांधींचे पंतप्रधानांना दोन प्रश्न

चीनने भारतीय भूभागात घुसखोरी केली नाही,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत म्हटले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट केले होते. “चिनी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी भारतीय भूभाग हवाली केला. जर जमीन चीनची होती, तर आमच्या जवानांना का मारण्यात आलं?, त्यांना कुठे मारण्यात आलं?”, असे प्रश्न राहुल गांधी यांनी सरकारला विचारले होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती