राष्ट्रीय स्वयंसेक संघ,भाजपच्या पुढाकाराने तेहेतीस हजार नागरीकांच्या कोरोना चाचण्या

विशेष प्रतिनिधी

नाशिक : महापालिकेने कोरोना विरोधात पुकारलेल्या युध्दात सर्वच स्तरावर चांगला प्रतिसाद मिळत आहेत. यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक,पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागात अतिशय हिरारीने काम केले. यामध्ये तेहेतीस हजार नागरीकांच्या कोविड-१९ चाचण्या केल्या. थेट सामान्य नागरीकांच्या दारात जाऊन या तपासण्या झाल्या. त्यामुळे कोरोनाविरोधात नागरीकांतही आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

भारतीय जनता पार्टीचे आमदार,खासदार,नगरसेवक,पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आजपर्यत शहरात ३२हजार९३३ तपासण्या केल्या. शहरातील सर्व भागात भाजपाचे सर्वच कार्यकर्ते झोकून देवून काम करीत होते, सामान्य नागरीकांमध्ये भितीचे वातावरण राहू नये, म्हणून भाजपचे आमदार,खासदार,नगरसेवक,पदाधिकारी, कार्यकर्ते प्रथम स्वतःची रॅपिड तपासणी करून घेतली. त्यानंतर परिसरातील नागरीकांच्या तपासण्या झाल्या. त्यामुळे कोरोनाची व त्यांच्या तपासण्याची भिती दूर झाली. नागरीकांमध्ये भितीचे वातावरण राहू नये,यासाठी विविध स्तरावर प्रयत्न झाले आहेत.

विशेषतः प्रारंभी कोरोनाचा संसर्ग शहरातील दाट,वस्तीच्या भागात आणि मजूर,गरीब व कामगारांच्या वस्तीत वाढत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याअनुषंगाने फुले नगर,हमाल वाडी,वज्रेश्वरी,मल्हारखान,बजरंगवाडी,वैदुवाडी,वाघाडी,संजय नगर,खडकाळी,आम्रपाली, रोकडोबावाडी आदी भागांत रॅपिड तपासणी करण्यात आली. त्यानंतर नाशिकरोड,पंचवटी,मध्य नाशिक भागात त्याविषयीच्या तपासण्या करण्यात येत आहेत. यात भाजपाचा सक्रीय सहभाग आहे.

तपासणी करणाऱ्यांना मार्गदर्शन,सहकार्य करून नागरीकांच्या तपासण्या करण्यास प्रवृत्त करण्यात आले. त्यासाठी सोशल मिडीयासह विविध माध्यमातून आवाहन करण्यात आले. ज्या भागात तपासणी दरम्यान पॉझीटीव्ह व संशयास्पद रूग्ण सापडले आहे., त्यांना तज्ञांमार्फेत प्रबोधन करून त्यांना धीर देणे, त्यांना घरी किंवा कोरोना सेंटरमध्ये दाखल करणे अशी कामे पक्षाच्यावतीने करण्यात आली. शहरातील नागरीकसुध्दा त्याला प्रतिसाद देत आहेत.

नाशिक शहरात २२ जुलैपासून सुरु झालेल्या या मोहिमेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारासह भाजपचे पदाधिकारी पूर्ण वेळ सहभागी झाले होते. त्यात भाजपची शहराची वैद्यकीय आघाडी महापालिका प्रशासनास सहकार्य करीत आहे. शहरातील नागरीकांना मोफत तपासण्या करावयाच्या असल्यास त्यांनी भाजप लोकप्रतिनिधीशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आसे आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*