राम मंदिर भूमिपूजन : असा असेल पंतप्रधानांचा ‘मिनिट टू मिनिट’ कार्यक्रम


 • तीन तास मोदी राहणार अयोध्येत

वृत्तसंस्था

अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्त आज राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे. यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तर दुसरीकडे करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचं पालनही करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळपास तीन तास अयोध्या दौऱ्यावर असतील. यामध्ये मंदिराचं दर्शन, पूजा अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.

असा असेल पंतप्रधानांचा कार्यक्रम

 •  ५ ऑगस्ट सकाळी ९.३५ वाजता दिल्लीतून प्रस्थान
 •  १०.३५ वाजता लखनौ विमानतळावर आगमन
 •  १०.४० वाजता अयोध्येकडे हेलिकॉप्टरमधून प्रस्थान
 •  ११.३० वाजता अयोध्येतील साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर लँडिंग
 •  ११.४० हनुमानगढी येथे पोहोचून दर्शन आणि पूजा
 •  १२.०० राम जन्मभूमी परिसरात पोहोचण्याचा कार्यक्रम स्वागत
 •  १२.१५ वाजता परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम
 •  १२.३० वाजता अभिजित मुहूर्तावर प्रत्यक्ष भूमिपूजनाचा कार्यक्रम
 •  १२.४० राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम
 •  २.०५ वाजता साकेत कॉलेजच्या हेलिपॅडसाठी प्रस्थान
 •  २.२० वाजता लखनौसाठी प्रस्थान
 •  लखनौवरून दिल्लीसाठी रवाना

आज दुपारी १२ वाजता पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. परंतु त्यापूर्वीच सर्व आमंत्रित पाहुणे आज अयोध्येत पोहोचणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आज संध्याकाळपासून अयोध्या सील करण्यात येईल. श्रीराम मंदिराच्या ट्रस्टकडून एकूण १७५ जणांना भूमिपूजनाचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. त्यापैकी देशातील निरनिराळ्या भागातील संतांचा समावेश आहे. प्रत्येक निमंत्रण पत्रिकेवर एक कोड छापण्यात आला आहे. सुरत्षेच्या कारणास्तव तो कोड तयार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

मोहन भागवत, इक्बाल अन्सारी येणार

मंदिर ट्रस्टकडून सर्वप्रथन इक्बाल अन्सारी यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. ते सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशिदीकडून पक्षकार होते. इक्बाल अन्सारी हे भूमिपूजनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागतंही करतील. याव्यतिरिक्त सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी अयोध्येत विशेष अतिथी म्हणून दाखल होणार आहेत. तर दुसरीकडे अशोक सिंघल यांच्या कुटुंबीयांनादेखील या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे.

करोनामुळे दिग्गज राहणार अनुपस्थित

करोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात येत आहे. यामुळे काही दिग्गज या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह काही नेते या कार्यक्रमाला येणार नाहीत. ते कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होतील. कल्याण सिंह, उमा भारती, मुरली मनोहर जोशी हेदेखील उपस्थित राहणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*  वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था