राज्यात आम्ही मोठे, प्रफुल्ल पटेल यांनी दाखविली कॉंग्रेसला जागा

राज्यात आधी कॉंग्रेस मोठी होती. आता आम्ही मोठे आहोत. त्यामुळे आता कॉंग्रेसने राष्ट्रवादीला विदर्भातही स्थान दिले पाहिजे, असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी कॉंग्रेसला त्यांची जागा दाखवून दिली आहे.


विशेष प्रतिनिधी

नागपूर : राज्यात आधी कॉंग्रेस मोठी होती. आता आम्ही मोठे आहोत. त्यामुळे आता कॉंग्रेसने राष्ट्रवादीला विदर्भातही स्थान दिले पाहिजे, असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी कॉंग्रेसला त्यांची जागा दाखवून दिली आहे.

नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी नाराजीच्या मुद्यावर आपण काडीचीही किंमत देत नसल्याचा इशारा कॉंग्रेसला दिला. ते म्हणाले, आजच्या घडीला आम्ही कॉंग्रेसला बरोबर घेऊन चाललो आहोत. राज्यात पूर्वी कॉंग्रेस मोठी होती, आता आम्ही मोठे झालो आहोत. आमचे नेते शरद पवार हेही मोठे नेते आहेत. त्यामुळे कॉंग्रेसने आता राष्ट्रवादीला विरोधातही स्थान दिले पाहिजे.

प्रफुल्ल पटेल यांनी राज्यात सत्तास्थापनेवेळीही आपली नाराजी व्यक्त केली होती. पटेल हे विदर्भातील नेते असून त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असलेल्या नाना पटोले यांनी त्यांचा पराभव केला होता. आता तेच नाना पटोले हे कॉंग्रेसमध्ये मोठे नेते बनले आहेत. त्यांना विधानसभा अध्यक्षपद दिले गेले आहे. पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाचीही मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे राजकारण पटेल यांच्यासाठी विदर्भात अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे त्यांनी कॉंग्रेसला सातत्याने विरोध केला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*