राजकीय आरक्षण संपले पाहिजे; पण वोट बँकेमुळे कोणत्याही पक्षात हिंमत नाही : प्रकाश आंबेडकर


  • नोकरी, शिक्षण आरक्षण घटनेच्या १६ व्या कलमानुसार मूलभूत अधिकार

वृत्तसंस्था

मुंबई : देशातले राजकीय आरक्षण संपले पाहिजे, असे परखड मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या जागांवरील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (एससी/एसटी) साठी आरक्षण संपवण्याची मागणी त्यांनी केली. पण वोट बँकेचे राजकारण आणि सत्ता गमवण्याच्या भीतीने कोत्याच पक्षात हे राजकीय आरक्षण संपवण्याची हिंमत नाही, हे राजकीय वास्तवही त्यांनी समोर आणले.

प्रकाश आंबेडकरांना आरक्षणाच्या घटनात्मक तरतुदीबाबत विचारले असता ते म्हणाले, “सुरवातीला हे फक्त १० वर्षांसाठी होते, ही संविधाना विषयीची चुकीची धारणा आहे. १० वर्षांच्या आरक्षणासाठी केलेली तरतूद राजकीय आरक्षणाची होती. हे (लोकसभा आणि विधासभेतील एससी/एसटीच्या) मतदारसंघांसाठी आरक्षण होते. नंतर स्वत:च डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची गरज नसल्याचे १९५४ मध्ये सांगितले होते.”

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “नागरिकांनी मान्य केले आहे की, मतदान हा त्यांचा हक्क आहे आणि मतदारसंघ राखीव असो किंवा सर्वसाधारण, आपल्या मतदानाचा उपयोग केला पाहिजे. हे ध्येय पूर्ण झाले आहे. आम्ही आणि आंबेडकरी जनता हेच बोलत आहे की, आता हे आरक्षण संपवले पाहिजे. पण ते भाजप असो वा काँग्रेस, ते संपविण्याची कोणाचीही हिंमत नाही.”

‘मी कधीच आरक्षणाचा फायदा घेतला नाही’

श्रीमंत लोक या आरक्षणाचा लाभ घेत आहेत, या प्रश्नावर ते म्हणाले, “मी कधीच आरक्षणाचा फायदा घेतला नाही. मी सर्वसाधारण जागेवरून निवडणूक जिंकलो होतो. परंतु, नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणाबाबत तो घटनेच्या अनुच्छेद १६ मध्ये प्रदान केलेला हा मूलभूत अधिकार आहे. जोपर्यंत हा मूलभूत अधिकार कायम राहील तोपर्यंत हे आरक्षण कायम राहील.”

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती