मोदी सरकारची महत्वाची योजना, रस्ते अपघातात जखमींसाठी कॅशलेस उपचार

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांच्या कॅशलेस उपचारासाठी मोदी सरकारतर्फे नवी योजना आखण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत अडीच लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी मोटर वाहन दुर्घटना कोषाची निर्मिती केली जाणार असून तसे पत्र सर्व राज्यांचे परिवहन सचिव आणि परिवहव आयुक्तांना केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने पाठविले आहे.

भारतात दरवर्षी सरासरी पाच लाख रस्ते अपघातांच्या घटना घडतात, जगाच्या तुलनेत भारतात रस्ते अपघातांची संख्या अतिशय जास्त आहे. यामुळे दरवर्षी सुमारे अडीच लाख लोकांना आपला जीव गमवावा लागतो तर जवळपास ३ लाख लोकांना कायमचे अपंगत्व येते.

यामुळे देशातील अनेक कुटुबांवर मोठा आघात होत असतो. त्याचप्रमाणे अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठीही मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो.

ते लक्षात घेता आता मोदी सरकारने रस्ते अपघातामध्ये जखमी होणाऱ्यांसाठी दिलासादायक योजना आणण्याचे ठरविले आहे. मोदी सरकारतच्या नव्या योजनेंतर्गत रस्ते अपघाताता जखमी झालेल्यांना अडीच लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे जनसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय दळवळण मंत्रालयातर्फे सर्व राज्यांचे परिवहन सचिव आणि परिवहन आयुक्त यांना पत्र पाठविण्यात आले आहे.

सदर योजनेसाठी मोटर वाहन दुर्घटना कोष तयार बनविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अपघातग्रस्तांना मदत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या (एनएचए) व्यवस्थेचा वापर केला जाणार आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*