महाराष्ट्र सांभाळता येईना, चालले देश सांभाळायला, नारायण राणे यांची उध्दव ठाकरेंवर टीका

‘महाराष्ट्र सांभाळता येत नाही आणि चालले देशातील दुसरी राज्ये सांभाळायला,’ असे ट्विट करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र सांभाळता येत नाही आणि चालले देशातील दुसरी सांभाळायला असे ट्विट करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राणे पिता-पुत्र उध्दव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करत आहे. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या क्षमतेवरही राणे यांनी शंका व्यक्त केली आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उध्दव ठाकरे यांनी बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व करावे, असे वक्तव्य केले. त्यावर राणे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“उद्धव ठाकरे कधीही आडपदडा ठेवून बोलत नाहीत. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढायला हवे, हीच भूमिका त्यांनी मांडली. उद्धव ठाकरे यांनी आता बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व करावे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत आहेत. देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईल,” असे राऊत म्हणाले.

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या क्षमतेवर शंका घेऊनच नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती. देशातील चीनी व्हायरसच्या साथीच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे घराबाहेरच पडले नाहीत. घरातूनच राज्याचा कारभार चालवित आहेत. यावरूनही राणे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*