महाजाॅब्स योजना महाआघाडी सरकारची की फक्त शिवसेना-राष्ट्रवादीची?; युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांचा परखड सवाल


वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे – पवार महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही तणाव नाही, बिघाड नाही, असा दावा शरद पवार करत असले तरी कुरबुरी सातत्याने समोर येत आहेत. आता युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून प्रश्न उपस्थित केला आहे. महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की शिवसेना-राष्ट्रवादीची? असा परखड सवाल तांबे यांनी विचारला आहे. याबाबत त्यांनी फोटो शेअर करुन ट्वीट केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महाजॉब्स’ पोर्टलचे ६ जुलै रोजी लोकार्पण झाले. राज्यातल्या उद्योगात मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्यात हा हे पोर्टल सुरु करण्यामागचा उद्देश आहे. कंपन्यांना कुठले कामगार हवे आहेत याची माहिती या पोर्टलवर असणार आहे.

महाजॉब्सच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक आणि उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांची छायाचित्रे आहेत. परंतु काँग्रेसच्या एकाही नेत्याचा फोटो नाही. हाच धागा पकडत सत्यजीत तांबे यांनी प्रश्न विचारला आहे.

ट्वीटमध्ये सत्यजीत तांबे यांनी लिहिलं आहे की, ” महा_जॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्यासारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे.”

आता महाजॉबच्या रुपाने औद्योगिक रोजगार ब्युरो म्हणून कंपन्या आणि कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कामगारांमधील महादुवा महाराष्ट्र शासनाने निर्माण केला आहे. जिथे महाराष्ट्रातील सर्व कुशल अर्धकुशल व अकुशल कामगारांना सतरा क्षेत्रात 950 अधिक व्यवसायामध्ये रोजगाराची एक अतिशय मोठी संधी आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती