भाजपने आदित्यचे नाव घेतले नाही; पण सीबीआयकडे तपास आधी दिला असता तर पुरावे नष्ट झाले नसते

 सुशांत सिंह प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची टीका


वृत्तसंस्था

पुणे : सुशांत सिंह प्रकरणी सीबीआय तपासातून ज्या गोष्टी, सत्य समोर येत आहे, ते आधीच झाले असते तर पुरावे नष्ट झाले नसते, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे – पवार सरकारवर केली. सुशांत प्रकरणी येणारे खुलासे आश्चर्यचकित करणारे आहेत. पण भाजपाच्या कोणत्याही नेत्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंचे नाव घेतलेच नाही, असे सांगून त्यांनी आदित्यचे नाव घेऊन खुलासे करणाऱ्या शिवसेना नेत्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुण्यातील बाणेर येथील कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले, “सुशांत प्रकरणी येणारे खुलासे आश्चर्यचकित करणारे आहेत. सीबीआय येईपर्यंत हे खुलासे का झाले नाहीत हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. वेगवेगळे जे प्रश्न उभे राहिले आहेत त्याची उत्तर देण्याची आवश्यकता आहे. ४० दिवसांनी सीबीआय आले आहे.” ४० दिवसात पुरावे नष्ट झाले असतील तर..”, अशी शंका देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

फडणवीस म्हणाले, “हार्ड डिस्क नष्ट करण्यात आल्याचे मला माध्यमांकडून कळालं. अशा ज्या गोष्टी येत आहेत त्यातून मुंबई पोलिसांवर काय दबाव होता? काय अडचण होती? कोणत्या राजकीय दबावात ते होते की त्यांनी याची तपासणी केली नाही असे प्रश्न मात्र निश्चित उभे राहत आहेत. सीबीआय जे काही सत्य आहे ते समोर आणेल. पण हे आधीच केलं असतं तर तर पुरावे नष्ट झाले नसते. लवकर आपल्याला काय घडले आहे किंवा कोण आरोपी आहे हे कळले असते.”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*