भाजपचा कोणताही आमदार ‘राष्ट्रवादी’त जाणार नाही : चंद्रकांत पाटील


विशेष प्रतिनिधी

पुणे : शरद पवार यांना काही आमदार कामानिमित्त भेटले असतील. यावरुन भाजपचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र भाजपाचा एकही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात नाही, व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार नाही,” असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी सोमवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते.

राजकारणात अनेकांचे जुने संबंध असतात. काही आमदाराच्या कामानिमित्त एकमेकांच्या भेटी होत असतात. त्यानुसार काही आमदार कामानिमित्त शरद पवारांना भेटले असतील, असे पाटील म्हणाले.

त्यांनी सांगितले की, आमदार फुटायचे झाल्यास भाजपच्या १०५ आमदारापैकी ८० जणांना जावे लागे. पण ते शक्य आहे का. महाविकास आघाडीतील नेत्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या आघाडीतील नेते करीत आहेत. त्यातून अशा वावड्या सोडल्या जात असल्याचेही ते म्हणाले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती