बॉलिवूड – ड्रग्ज कनेक्शन बाहेर येताच राम गोपाल वर्मांना दाऊदप्रेमाची उबळ

  • “अर्णब गोस्वामीसमोर दाऊद म्हणजे लहान मुलगाच”; वर्मांची खोचक टीका

वृत्तसंस्था

 

मुंबई : सुशांत प्रकरणाच्या निमित्ताने बॉलिवूड – ड्रग्ज कनेक्शन बाहेर पडतेय हे पाहताच दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांची दाऊदप्रेमाची उबळ बाहेर आली. त्यांनी या उबळीतून अर्णब गोस्वामीवर खदखद बाहेर काढली.

“अर्णब गोस्वामीसमोर कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम लहान मुलगा आहे का?”, असा खोचक सवाल  राम गोपाल वर्मा यांनी विचारला आहे. राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर टीकास्त्र डागले। आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्णब गोस्वामी सतत चर्चेत असून सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी त्यांनी अनेक मार्मिक प्रश्न उपस्थित केले आहेत.

त्यामुळे बॉलिवूडमधल्या अनेकांची आणि तथाकथित लिबरल्सची गोची झाली आहे. त्यामुळे अनेकांनी अर्णबवर टीकास्त्र डागले आहे. त्यातच आता राम गोपाल वर्मा यांची भर पडली आहे. त्यांनी दाऊदप्रेमाच्या उबळीतून मनातील खदखद बाहेर काढली आहे.

“मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माझा एक प्रश्न आहे. आपल्या समाजाला नुकसान पोहचवणारा यापेक्षा मोठा माफिया कोणी असू शकतो का ?अर्णब गोस्वामी समोर दाऊद इब्राहिम म्हणजे लहान मुलगाच आहे”, असे खोचक ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अर्णब गोस्वामी यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अनेक गंभीर सवाल केले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, संजय राऊत यांना मुलाखत देण्याचे अाव्हानही दिले आहे. हे अाव्हान या तिघांनी अद्याप स्वीकारलेले नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*