बलात्काराचा गुन्हा मागे घेत नसल्याने पीडितेच्या १० वर्षांच्या मुलीला पेटवले; पारनेर तालुक्यातील धक्कादायक घटना

  • ठाकरे – पवार सरकारच्या राजवटीत कायदा व सुव्यवस्थेची दाणादाण

वृत्तसंस्था

अहमदनगर : बलात्काराची तक्रार पोलिसांतून मागे घेत नाही म्हणून आरोपींनी पीडितेच्याच १० वर्षांच्या मुलीला पेटवून देण्याचा भयानक कृत्य पारनेर तालुक्यात घडले आहे. ठाकरे – पवार सरकारच्या राजवटीत कायदा व सुव्यवस्थेची दाणादाण उडाल्याचा हा प्रकार समोर येतो आहे.

आरोपी राजाराम तरटे आणि अमोल तरटे यांच्यावर आदिवासी समाजातील २६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आरोपी पीडितेवर हा गुन्हा मागे घेण्याचा दबाव आणत होते. परंतु पीडितेने त्यांची मागणी मान्य न केल्याने आरोपींनी थेट अत्याचारित पीडितेच्या १० वर्षांच्या मुलीला पेट्रोल टाकून पेटवले. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बलात्कारातील आरोपींच्या या भयानक कृत्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून काल रात्री सुपा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस अधिकारी अजित पाटील हे करीत आहेत.

राज्यात कायदा व सुव्यवस्थेची दाणादाण उडाली आहे आणि ठाकरे – पवार सरकारमधील मंत्री बदल्यांमध्ये “अर्थपूर्ण” चर्चा करण्यात गुंतले असल्याचे चित्र आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*