बंगळुरू दंगलीमागे कट्टर इस्लामिक संघटना, दिल्ली दंगलीशी कनेक्शन

दिल्लीप्रमाणेच बंगळुरूतही दंगल घडवून आयटी सिटीचे वातावरण खराब करण्याचा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या इस्लामिक कट्टरतावादी संघटनेचा प्रयत्न होता. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या राजकीय संघटनेने त्यासाठी मदत केल्याचे उघड झाले आहे.


विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : दिल्लीप्रमाणेच बंगळुरूतही दंगल घडवून आयटी सिटीचे वातावरण खराब करण्याचा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या इस्लामिक कट्टरतावादी संघटनेचा प्रयत्न होता. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या राजकीय संघटनेने त्यासाठी मदत केल्याचे उघड झाले आहे.

एका आमदाराच्या नातेवाईकाकडून पैगंबर मोहम्मद साहेब यांच्याविषयी सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून दिल्लीत दंगल झाली. या प्रकरणी ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या एका नेत्याला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे हा नेता दिल्ली दंगलीशीही संबंधित आहे.

बंगळुरू पोलिसांनी डीजे हाळी पोलीस स्टेशन परिसरात हिंसाचार घडवून आणण्यासाठी लोकांना चिथावणी देण्याच्या आरोपावरून ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा नेता मुजामिल पाशा याला अटक केलीय. पाशानंच हिंसाचार घडवून आणण्यासाठी लोकांना एकत्र करण्याचं आणि त्यांची माथी भडकावण्याचं काम केले. पाशा या अगोदर सगायपुरा मतदार संघातून महानगरपालिकेच्या निवडणुकीलाही उभा होता.

सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया ही इस्लामिक कट्टरतावादी संघटना तर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही राजकीय संघटना आहे. दिल्लीत नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीत २३ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या दंगलीच्या चौकशीतही ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चं नाव समोर आलं होतं.

अंमलबजावणी संचलनालयाकडून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. दिल्ली दंगलीचा मुख्य आरोपी आणि आमद आदमी पक्षाचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसैन यानं वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून या कंपन्यांच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे दंगा घडवून आणण्यासाठी १२ लाख रुपये जमवले होते. यासाठी त्याला ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडूनही मदत मिळाली होती.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*