नेपाळ पंतप्रधान ओली संकटात, पक्षांतर्गत धुसफुसीसाठी भारताला धरले जबाबदार

भारताने आजपर्यंत मोठ्या भावाप्रमाणे सांभाळले असतानाही चीनच्या कच्छपि लागून भारताशी संघर्षाची भूमिका नेपाळचे पंतप्रधान पीएम ओली यांनी घेतली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत राजकारणातच ते संकटात सापडले आहेत. मात्र, यासाठीही भारतच जबाबदार असल्याचा बेभान आरोप त्यांनी केले आहे.


विशेष प्रतिनिधी

काठमांडू : भारताने आजपर्यंत मोठ्या भावाप्रमाणे सांभाळले असतानाही चीनच्या कच्छपि लागून भारताशी संघर्षाची भूमिका नेपाळचे पंतप्रधान पीएम ओली यांनी घेतली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत राजकारणातच ते संकटात सापडले आहेत. मात्र, यासाठीही भारतच जबाबदार असल्याचा बेभान आरोप त्यांनी केले  आहे.

भारत-नेपाळ सीमेवरील लिपुलेखा आणि इतर भागांवरून नेपाळने भारताशी वाद सुरू केला आहे. यामध्ये ओली यांची भूमिका महत्वाची आहे. चीनच्या सांगण्यावरूनच ते हे करत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, दुसऱ्या बाजुला नेपाळमधील कम्युनिस्ट पार्टीमध्ये मात्र तीव्र नाराजी आहे. संपूर्ण देशात सरकारबाबत असंतोष निर्माण झाला आहे. ओली यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

या सगळ्यावर पांघरुण घालण्यासाठी ओली आता उग्र राष्ट्रवादी भूमिकेचा पुरस्कार करू लागले आहेत. भारताकडूनच आपल्याला हटविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप ओली यांनी केला आहे. भारतीय दुतावासातूनच हे षडयंत्र सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ओली म्हणाले, मला हटविण्याचे षडयंत्र सुरू असले तरी ते शक्य होणार नाही. काठमांडू येथील हॉटेलमध्ये यासाठी बैठका सुरू आहेत. यामध्ये एक दुतावासही सहभागी आहे. भारतीय जमीन नेपाळच्या नकाशात दाखविल्यापासूनच आपल्याविरुध्द षडयंत्र सुरू आहे. परंतु, नेपाळचा राष्ट्रवाद इतका दुर्बल नाही. वास्तव नकाशा छापण्यासाठी पंतप्रधानांना हटविण्याचा प्रयत्न होतोय, हे अकल्पित आहे.

दरम्यान, नेपाळचे माजी पंतप्रधान आणि सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष पुष्प कमल दहल प्रचंड यांनी ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पक्षाच्या स्टॅंडींग कमीटीचे बहुतांश सदस्य प्रचंड यांच्या बाजुने आहेत. ओली यांनी राजीनामा दिला नाही तर पक्षात फूट पडेल असा इशारा प्रचंड यांनी दिला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*