निवृत्त लष्करी अधिका-यांच्या नावाने मंत्री आव्हाडांचे ‘लाय’; शेअर केले दोघांचे फेक ट्विट!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र सरकारमधील वादग्रस्त कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड हे पुन्हा एकदा खोटे पडले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या मंत्र्यांनी असत्य माहिती ट्वीट केल्याचे उघड झाले आहे.

भारत-चीन सीमावादावर निवृत्त भारतीय सेनाधिकारी काय म्हणतात ते बघा, अशा आशयाची टिपण्णी करत ‘शतकातील सर्वांत मोठा खोटारडेपणा’ या शीर्षकाखाली आव्हाड यांनी एक ग्राफिक शेअर केले. त्यामध्ये चार लष्करी अधिकारयांचे ट्विट्स एकत्रित केले आहेत. त्यापैकी दोन अधिकारयांचे ट्विट फेक असल्याचे दिसते आहे. ज्यांच्या नावाने फेक ट्विट केले आहे, त्या निवृत्त अधिकारयांची नावे लेफ्टनंट जनरल प्रकाश मेनन व कर्नल ए.जे. सँचिझ अशी आहेत. लेफ्टनंट जनरल मेनन यांच्या नावाने चालविलेल्या ट्विटमध्ये तर ‘मोदींविरुद्ध देशद्रोहाचा खटला चालविण्याची’ मागणी केली आहे. गंमत म्हणजे आव्हाड आणि त्यांच्या कंपूंनी मेनन यांचे कथित ट्विट 20 जूनरोजी दुपारीच टाकले होते. पण त्या ट्विटवर मात्र वेळ आहे 20 जून रात्री दहा वाजता!

असाच काहीसा प्रकार कर्नल(निवृत्त) सँचिझ यांच्याबाबत दिसतोय. चीनी घुसखोरी न झाल्याबाबतचे मोदींचे निवेदन हे ‘शतकातील सर्वांत मोठे खोटे’ आहे, असे त्यांच्या नावाने ट्विट पसरविलेले आहे. मात्र, अन्य दोन ट्विट खरे आहेत. ज्यांचे खरे आहेत, ते लेफ्टनंट जनरल (निवृत्त) रामेश्वर राॅय हे वादग्रस्त आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. आपल्या पत्नीच्या ब्यूटी पार्लरचा खर्च खास निधीतून केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

आव्हाड यांची ही फेकुगिरी काही नेटकर्त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतरही आव्हाड यांनी चूक दुरुस्त करण्याची तसदी घेतली नाही.

मंत्री आव्हाड यांच्या ‘फेक’ ट्वीटमुळे सैनिकांच्या बलिदानावर शिंतोडे उडवले जात आहेत, हे पाहून अनेक नेटकरी आव्हाड यांच्यावर तुटूनही पडले. मंत्रीपदी असणारया व्यक्तीने जबाबदारीने ट्वीट केले पाहिजे, अशीही अपेक्षा नेटकरयांनी व्यक्त केली. “आव्हाड, तिस्ता सेटलवाड, बरखा दत्त हे लोक चीनच्या ‘प्रोपोगंडा वॉर’चे प्रवक्ते आहेत. या सर्वांनी केलेला उदो उदो हेच चीनचे सामर्थ्य,” अशीही टीका एका नेटकरयाने केली आहे.

यापू्र्वीही अनेकवेळा आव्हाड यांच्या फेक माहिती शेअर केल्याचा आरोप झालेला आहे. दुसरीकडे स्वतःबद्दल आक्षेपार्ह लिहिणारया एका युवकाला त्यांनी घरी नेऊन बेदम चोप दिल्याचाही आरोप आहे. त्याबद्दल पोलिसांत गुन्हाही दाखल झालेला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था