नातवाची कवडीपेक्षाही किंमत कमी करून शरद पवार निघालेत भाजप फोडायला…!!

  • राष्ट्रवादीच्या कट कारस्थानाला व्यूहरचनेचे गोंडस नाव; घरवापसीच्या नावाखाली फोडाफोडीचा डाव
  • कवडीपेक्षाही कमी किंमत असलेल्या पुत्राच्या वडिलांकडे आमदार फोडण्याची “मूल्यवान” जबाबदारी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : नातवाची कवडीपेक्षाही किंमत कमी करून शरद पवार आपल्या मूळ राजकीय फ़ितरतीवर उतरले आहेत. ते भाजपचे आमदार फोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती बाहेर येत आहे. राष्ट्रवादीने या कट कारस्थानाला राजकीय व्यूहरचनेचे गोंडस नाव देऊन “आमदारांची घरवापसी” अशी मखलाशीही केली आहे. भाजपची फोडाफोडी करून आमदारांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याची “मूल्यवान” जबाबदारी कवडीपेक्षाही कमी किंमत असलेल्या नातवाच्या वडिलांकडे म्हणजे अजित पवारांकडे सोपविण्यात आल्याची माहिती आहे.

गेल्या काही दिवसांपासून सर्व पक्ष एकमेकांचे आमदार संपर्कात असल्याचा दावा करत आहेत. काही दिवसाआधीच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी आतूर असल्याचा दावा केला होता. चंद्रकांत पाटलांनी तो खोडून काढला होता. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात राजकीय चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यातूनच आता राष्ट्रवादीच्या घरवापसी अभियानाच्या नावाखाली शरद पवार मूळ राजकीय फ़ितरत प्रणीत फोडाफोडी राजकारण सुरू होणार असल्याची माहिती मिळते आहे.

भाजपमध्ये गेलेल्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीने ही फोडाफोडीची व्यूहरचना आखली असल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील महाआघाडीतील तीनही पक्षांचे राजकारण, राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पाहून भाजपमधून नेते आणि कार्यकर्ते फोडून राष्ट्रवादीत प्रवेश दिला जाणार आहे.

भाजप फोडून नेते – कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याची जबाबदारी ज्यांचे पुत्र कवडीपेक्षाही कमी असणारे आणि अपरिपक्व अाहेत, अशा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर असणार आहे. लवकरच भाजप फोडून राष्ट्रवादीत काही भाजप आमदारांच्या प्रवेश करून घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत. फुटीर आमदारांना घेताना शिवसेना आणि काँग्रेसला विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे देखील सूत्रांनी म्हटले आहे.

शरद पवार फोडाफोडी करतील, ही “हिंट” राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती. ती “हिंट” खरंच ठरत असेल तर कोणते आमदार पुन्हा शरद पवारांच्या फोडाफोडीतून भाजपमधून फुटून राष्ट्रवादीत येतील याबाबत आता जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*