देशाच्या गरजेनुसार आर्थिक धोरणाची आता सुरूवात, सरसंघचालकांकडून कौतुक

स्वातंत्र्यानंतर देशाच्या गरजेनुसार आर्थिक धोरण ठरवण्यात आले नाही. आपण काही करून शकतो असे मानलेच गेले नाही. आता चांगलं झालं की त्याची सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा याच दृष्टीकोनातून केली आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.


विशेष प्रतिनिधी

नागपूर : स्वातंत्र्यानंतर देशाच्या गरजेनुसार आर्थिक धोरण ठरवण्यात आले नाही. आपण काही करू शकतो असे मानलेच गेले नाही. आता चांगलं झालं की त्याची सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा याच दृष्टीकोनातून केली आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

प्रा. राजेंद्र गुप्ता यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन संरसंघचालकांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर रशियाकडून पंचवार्षिक योजना घेतली, पश्चिमेकडील देशांचं अनुकरण करण्यात आलं. परंतु आपल्या लोकांचं ज्ञान आणि त्यांच्या क्षमतेकडे पाहिलं नाही. आपल्या देशात उपलब्ध असलेल्या अनुभवाच्या आधारावर ज्ञानाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

स्वदेशीचा अर्थ प्रत्येक विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालणं असा होत नाही, असे भागवत म्हणाले. त्यांनी सांगितले की, आता संपूर्ण जग आणि कोरोना द्वारे मिळालेल्या अनुभवांमधून विकासाचे नवे मॉडेल तयार केले पाहिजे. आपल्याकडे परदेशातून काय येते यावर आपण अवलंबून राहायला नको. जर आपल्याला तसं करायचं असेल तर आपल्या अटींवर ते केलं पाहिजे. परदेशात जे काही आहे त्याचा आपल्याला बहिष्कार करायचा नाही. परंतु ते आपल्या अटींवर घेतलं पाहिजे. ज्ञानाच्या बाबतीत जगाकडून चांगले विचार आले पाहिजेत.

आपल्या लोकांवर, आपल्या ज्ञानावर आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणारा समाज, व्यवस्था आणि शासन हवं. जगानं एक वैश्विक बाजार बनलं पाहिजे असा एक विचार आला आणि त्याच आधारावर विकासाची व्याख्या करण्यात आली. त्यानंतर विकासाची दोन मॉडेल आपल्यासमोर आली. त्यापैकी एक मानवाची सत्ता असल्याचं सांगतं तर दुसरं समाजाची सत्ता असल्याचे भागवच म्हणते. विकासाच्या या दोन्ही मॉडेलमधून जगाला सुख मिळालं नाही. हळूहळू याचा अनुभव जगाला आला आणि चीनी व्हायरसच्या महामारीदरम्यान ही बाब प्रामुख्यानं सर्वांच्या समोर आली. आता विकासाच्या तिसऱ्या मॉडेलवर विचार होणं गरजेचं आहे आणि मूल्यांवर आधारित असायला हवे, असे त्यांनी सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*