तुंबलेल्या मुंबईकडे ठाकरे – पवार सरकारचे दुर्लक्ष; मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या युवतीच्या अटकेची मात्र तत्परता


  • शिवसैनिकाने केली होती तक्रार

विशेष प्रतिनिधी 

मुंबई : रेकॉर्डब्रेक पावसाने तुंबलेल्या मुंबईकडे ठाकरे – पवार सरकारने दुर्लक्ष केले आहे, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या सुनयना होले या सोशल मीडिया यूजर युवतीला मात्र अटक करण्यात तत्परता दाखविली आहे.

या अटकेविरोधात सोशल मीडियात isupportsunayana जोरात असून अनेकजण तिला पाठिंबा देण्यासाठी पुढे आले आहेत. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तिला मदत करण्याची तयारी दाखविली आहे.

सुनयना हिने स्वत:च्या सोशल मीडिया हँडलवरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावर रोहन चव्हाण या शिवसैनिकाने नालासोपाराच्या तुळींज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

सुनयना निडर नारी या नावाने देखील सोशल मीडिवर सक्रीय आहे. ती सतत उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर बदनामीकारक पोस्ट करते, अशी तक्रार चव्हाण याने केल्यावर पोलिसांनी तिला अटक केली. यावर माजी शिवसैनिक रमेश सोळंकी यांनी गणपती बाप्पांचा अपमान केला तर कारवाई होत नाही. पण मुख्यमंत्र्यांविरोधात लिहिले तर लगेच अटक होते, वा रे लोकशाही असे ट्विट केले आहे.

सुनयना विरोधात ही पहिली कारवाई नाही. तिला एप्रिलमध्येही कारवाईला सामोरे जावे लागले आहे. लेखिका शेफाली वैद्य यांनाही असेच तबलिगी जमातीवर प्रश्नचिन्ह लावल्याबद्दल कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले होते.

उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडून मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर त्यांच्याविरोधात टीका करणाऱ्या व्यक्तींना ठाकरे – पवार सरकार कायद्याच्या विविध कलमांमध्ये अडकवत आहे. परंतु, या व्यक्तींना सोशल मीडियातून चांगला पाठिंबा मिळतो आहे.

दीपाली भोसले या युवतीने मशिदीवरील भोंग्यांविरोधात तक्रार केली त्यावेळी तिला धर्मांध मुसलमानांनी धमक्या दिल्या. त्यावर काही कारवाई करण्याएेवजी ठाकरे – पवार सरकारच्या पोलिसांनी तिलाच तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले. हा प्रकार ताजा असतानाच सुनयनाच्या अटकेचा प्रकार समोर आला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था