टिक टॉकवरील बंदीचे चीनवर दीर्घकालीन परिणाम

  •  चीन सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे
  •  २०१९ साली भारतीय युजर्सनी TikTok वर ५५० कोटी तास घालवले होते 

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मोदी सरकारने TikTok सह ५९ चीनी एप्लिकेशन्सवर बंदी घातली. मात्र, ही केवळ राजकीय कृती आहे. चीनला याचा फारसा आर्थिक फटका बसणार नाही, असा प्रतिवाद काही जणांनी केला असला तरी भारतातील चिनी Appच्या युजर्सची संख्या पाहता या सगळ्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. चीनी सरकारने या बंदीची दखल घेत परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे.

या क्षेत्रातील जाणकार तरुण पाठक यांनी याचे विश्लेषण केले आहे. ते म्हणाले, “भारतामध्ये मे महिन्यात TikTok, Club Factory , UC Browser आणि अन्य चिनी Apps वरील युजर्सची संख्या ५० कोटी इतकी होती. यामध्ये TikTok च्या १० कोटी युजर्सचा समावेश आहे. यापूर्वी २०१९ साली TikTok वर भारतात आठवडाभरासाठी बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी TikTok विकसित करणाऱ्या ByteDance या कंपनीने कोर्टात धाव घेतली होती. या निर्णयामुळे दिवसाला आम्हाला पाच लाख डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागत असल्याची माहिती या कंपनीने दिली होती.”

एका अहवालानुसार, २०१९ साली भारतीय युजर्सनी TikTok वर ५५० अब्ज तास घालवले. त्यामुळे या काळात भारतातील TikTokच्या युजर्सची संख्या ८.१ कोटींपर्यंत जाऊन पोहोचली होती. तर Tiktok time spent च्या बाबतीत भारत जगात अव्वल ठरला होता. या यादीतील पुढील ११ देशांच्या एकत्रित युजर्सपेक्षा भारतातील युजर्सची संख्या अधिक होती. यावरून TikTok च्या भारतातील व्यावसायिक उलढालीची कल्पना येऊ शकते. याशिवाय, गेल्या काही काळात Helo , Likee , Bigo Live ही चिनी Apps देखील भारतात झपाट्याने लोकप्रिय होऊ लागली होती.

मात्र, दुसऱ्या बाजूला या चिनी Apps वरील बहुतांश क्रिएटर्स हे भारतीय आहेत. याशिवाय, या App कंपन्यांच्या भारतातील कार्यालयांमध्ये हजारो भारतीय काम करत आहेत. त्यामुळे आता ही Apps कायमची बंद पडली तर हजारो लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळू शकते.

त्यांची पर्यायी व्यवस्था केली. भारतीय कंपन्यांनी पर्यायी Apps तयार केली तर त्यांचाही संख्यात्मक विस्तार अशाच वेगाने होईल आणि चीनी कंपन्यांना मोठे नुकसान सोसावे लागेल, असे केंद्र सरकारच्या सूत्रांचे म्हणणे आहे. या बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज थोड्याच वेळात काही घोषणा करणे अपेक्षित आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*