टिक टॉकला ट्रम्प यांचा मोठा दणका; ९० दिवसांत संपत्ती विकण्याचे आदेश

  • चीनी गुप्तहेर संस्था बाईटडन्स पाठीशी; अमेरिकेकडे भक्कम पुरावे

वृत्तसंस्था

मुंबई : अमेरिकेने टिक टॉकला चांगलाच दणका दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिक टॉकला अमेरिकेतील संपत्ती विकण्याचे आदेश दिले आहेत. जगात कोरोनाचा महामारीच्या खाईत लोटणाऱ्या चीनविरोधात तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. अमेरिकेने चीनविरोधात उघड उघड दंड थोपटलेत. याचा फटका चीनच्या कंपन्यांना बसतोय. आधी भारताने चीनला ५९ अ‍ॅप बंद केलीत. यात टिकटॉकचाही समावेश आहे.

अमेरिकेत चिनी कंपनी बाईटडन्सचे दिवस वाईट आले आहेत. या चिनी कंपनीविरुद्ध ठोस पुरावे आहेत आणि आता हे अमेरिकेतूनही त्यांना जावे लागेल. इतकेच नाही तर एकतर टिकटॉक अ‍ॅप अमेरिकन कंपनीला विकता येईल किंवा त्याचा बोऱ्याबिस्तार गुंडाळावा लागेल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी बाईटडन्ससविरूद्ध एक नवीन आदेश जारी केला आहे, त्यानुसार कंपनीने ९० दिवसांच्या आत टिक टॉकला कारवाई होण्याआधीच संपत्ती विकावी लागणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेत टिकटॉक अ‍ॅप बंद करायचा आहे. बाईटडन्सच्या मागे चिनी गुप्तचर संस्था कार्यरत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, ‘बाईडेन्सविरोधात भक्कम पुरावे सापडले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ते पुरेसे आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठीही हे महत्त्वाचे पाऊल आहे.

यापूर्वी ट्रम्प यांनी टिक टॉकवर बंदी आणण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेतल्या टिकटॉकच्या ऑपरेशनला त्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत अमेरिकन कंपनीला विकण्याचे आदेश दिले. मात्र मायक्रोसॉफ्ट आणि ट्विटरने हे अ‍ॅप खरेदी करण्यास उत्सुकता दर्शविली आहे. त्याचबरोबर बाईटडन्स कंपनीच्या कर्मचार्‍यांनी ट्रम्प यांच्या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*