चेन्नईतील व्यावसायिकाच्या मुलीचे मतपरिवर्तन करून लव्ह जिहाद, झाकिर नाईकवर गुन्हा

चेन्नईतील एका व्यावसायिकाच्या मुलीचे मतपरिवर्तन करून लव्ह जिहादसाठी तिच्याशी एका बांगला देशातील नेत्याच्या मुलाचे लग्न लावून देण्यात आले आहे. याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वादग्रस्त इस्लामिक उपदेशक झाकिर नाईक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : चेन्नईतील एका व्यावसायिकाच्या मुलीचे मतपरिवर्तन करून लव्ह जिहादसाठी तिच्याशी एका बांगला देशातील नेत्याच्या मुलाचे लग्न लावून देण्यात आले आहे. याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वादग्रस्त इस्लामिक उपदेशक झाकिर नाईक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

एका व्यावसायिकाची मुलगी आणि बांगला देशातील एका मोठ्या नेत्याच्या मुलाचे लग्न लावून देण्यात आले. हा नेता माजी पंतप्रधान खालिदा जियाच्या बांगला देश नॅशनलिस्ट पार्टीचा आहे. याप्रकरणी झाकिर नाईक आणि अमेरिकेत राहणाऱ्या पाकिस्तानातील दोन कट्टरतावादी उपदेशक यासिर कादी आणि नौमान अली खानला आरोपी बनवले आहे.

मुलीच्या वडिलांनी मे महिन्यात चेन्नई सेंट्रल क्राइम ब्रांचमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांनी म्हटले होते की, माझी मुलगी लंडनमध्ये शिकत आहे. तिथे ती एका कट्टरतावाद्याच्या संपर्कात आली. तिला इस्लाम धर्म स्विकारण्यास बळजबरी करण्यात आली आणि नंतर तिचे अपहरण करुन बांगलादेशात नेण्यात आले.

चेन्नईचे पोलिस कमिश्नर महेश कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, याप्रकरणाचा तपास परदेशात होणार आहे, त्यामुळे प्रकरण एनआयएला ट्रांसफर केले आहे. 28 मे रोजी तमिळनाडु सरकारने केंद्र सरकारला केस दाखल करण्यास सांगितले होते.

याप्रकरणी प्रमुख आरोपी बीएनपीचे माजी खासदार शखावत हुसैन बुकलचा मुलगा नफीस आहे. बकुलने 1991 आणि 2001 मध्ये नरसिंगडी-4 वरुन निवडणूक लढवली होती. त्याला डिसेंबर 2013 मध्ये खालिदा जियाच्या घरातून अटक केली होती. जून 2017 मध्ये त्याच्यावर एका व्यावसायिकाने बळजबरीने वसुली केल्याचा आरोप लावला होता.

भारतात झाकिर नाईकवर मनी लॉन्ड्रिंग आणि कट्टरता पसरवण्याचा आरोप आहे. अटक होण्याचा भीतीने नाईक 2016 मध्ये मलेशियाला पळून गेला होता. त्याच्यावर मलेशियात अल्पसंख्याक हिंदू आणि चीनी लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*