चीनी सोशल मीडिया weibo अकाऊंट पंतप्रधान मोदींकडून डिलीट

  • होते दोन लाख ४४ हजारांहून अधिक फॉलोअर्स

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत असल्याचा आधारे भारत सरकारने सोमवारी टिकटॉक, शेअरइट, हॅलो, ब्युटी प्लस या चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली. या निर्णयानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही चीनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म weibio वेईबोवरून आपले अकाउंट डिलीट केले आहे. पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या या निर्णयाची माहिती एएनआयने दिली आहे.

भारताने ५९  चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही चीनमध्ये लोकप्रिय असणाऱ्या विबो या सोशल नेटवर्किंग साइटवरील आपले अधिकृत अकाउंट बंद केले आहे. मोदींनी काही वर्षांपूर्वी या प्लॅटफॉर्मवर अकाउंट सुरू केले होते. मात्र लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हे अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोदी २०१४ साली पंतप्रधान झाल्यानंतर २०१५ साली पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून चीन दौऱ्यावर जाण्याआधी हे अकाउंट सुरू केले होते. या अकाउंटवर २ लाख ४४ हजार फॉलोअर्स होते. यापैकी बहुतांशी फॉलोअर्स हे चिनी आहेत. मोदींनी २०१५ साली या अकाउंटवरून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. बुधावारी या अकाउंटवरील मोदींचा फोटो, कव्हर फोटो सारे काही काढून टाकण्यात आले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*