चीनी सैनिकांना सहा वेळा भिडणाऱ्या इंडो तिबेटियन २१ जवानांना गॅलेंट्री मेडल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चीनी जवानांना सीमेवर सहा वेळा भिडणाऱ्या इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस फोर्सच्या २१ शूर जवानांना गॅलेंट्री मेडल जाहीर करण्यात आली आहेत. हिमालयाच्या ऊंच शिखरांवर आयटीबीपीचे जवान ड्यूटी करतात. २४ ऑक्टोबर १९६२ ला याची स्थापना झाली आहे.

आयटीबीपीच्या जवानांनी मे आणि जून २०२० महिन्यांत ५ – ६ वेळा लडाखच्या विविध भागात चीनी सैनिकांशी यशस्वी मुकाबला केला. या आयटीबीपीच्या २१ अधिकारी आणि जवानांना गॅलेंट्री मेडल देण्याची आयटीबीपीचे डीजी सुरजीत सिंह देसवाल यांनी घोषणा केली.

आयटीबीपीच्या जवानांनी पूर्व लडाखमध्ये चीनशी झालेल्या हिंसक चकमकीदरम्यान फक्त स्वतःचा बचाव केला नाही, तर चीनी सैनिकांची संख्या जास्त असूनही त्यांचा तडाखेबंद सामना केला. त्यांनी या संघर्षात जखमी झालेल्या भारतीय जवानांना आर्मीसोबत मिळून सुरक्षित ठिकाणी नेले.

आतापर्यंत फक्त भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये गलवान घाटीत झालेल्या चकमकीची माहिती समोर आली, पण यापूर्वी आयटीबीपी आणि चीनी सैनिक अनेवेळा समोरा-समोर आले आहेत. यादरम्यान मारामारी आणि दगडफेकही झाली. अनेकवेळा ही चकमक 17-18 तास चालली. यादरम्यान काही वेळी चीनी सैनिक तर काहीवेळी आयटीबीपीचे सैनिक जखमी झाले.

डीजी आयटीबीपीने 294 जवानांना ईस्टर्न लडाखमध्ये चीनी सैनिकांचा मोठ्या हिमतीने सामना केल्याबद्दल डीजी प्रशंसा पत्र आणि पदक प्रदान केले आहे.

आयटीबीपी चीन सीमेवरील फ्रंटलाइन फोर्स आहे. ३४८८ किलोमीटर लांब असलेल्या चीनी सीमेवर फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस आहे. प्रत्येक ठिकाणी आयटीबीपीचे पोस्ट आहे आणि फोर्स पेट्रोलिंगद्वारे हाय अल्टीट्यूड असलेल्या या भागांची सुरक्षा करते. गॅलेंट्री मेडलची घोषणा ज्या सैनिकांसाठी झाली आहे, त्यांनी पँगॉन्ग लेक पासून गलवान आणि हॉट स्प्रिंगदरम्यान ईस्टर्न लडाखच्या अनेक भागात चीनी सैनिकांचा सामना केला आहे.

तसेच, मागील दोन महिन्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये कमीत-कतमी सहा वेळेस गदडफेक आणि मारामारी झाली आहे. परंतू, ही माहिती गोपनीय असल्यामुळे कधी समोर आली नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*