चीते की चाल, बा़ज की नज़र और भारतीय फौ़जपर संदेह नही करते। चीन को भी मात दे सकती है।

  • पँगाँग सरोवर परिसरात चिन्यांच्या नजरेसमोर टेकड्या ताब्यात घेतल्या; स्पेशल फ्रंटियर फोर्सचा भीम पराक्रम

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्याने एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला. रणनैतिक दृष्टीने अत्यंत मोक्याच्या दक्षिण किनाऱ्याजवळच्या उंच टेकडयांवर चीनची नजर होती. पण भारताच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सने म्हणजेच SFF ने चीनचा हा डाव उधळून लावला.

SFF च्या विकास बटालियनने ही कामगिरी पार पाडली. चित्त्याची चपळता, घारीची नजर असलेले SFF च्या स्पेशल ट्रेन कमांडोजनी चीनच्या नजरेसमोर चपळाईने कारवाई करत या टेकडया ताब्यात घेतल्या. चीनने या टेकडयांजवळ भारताच्या सैन्य हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे आणि टेहळणी उपकरणे बसवली होती. भारतीय सैन्याच्या या SFF युनिटबद्दल आणि भारतीय सैन्यातील त्यांच्या ऐतिहासिक भूमिकेबद्दल समजून घेऊया.

स्पेशल फ्रंटियर फोर्स म्हणजे काय ?

१९६२ सालच्या भारत-चीन युद्धानंतर SFF ची स्थापना करण्यात आली. भारतीय सैन्याचे हे एक गुप्त युनिट आहे. तिबेटमधून आलेल्या जवानांची यात भरती केली जाते. आता यामध्ये गोरखा आणि तिबेटियन जवान असतात. सुरुवातीला या युनिटला ‘एस्टॅब्लिशमेंट २२’ असे नाव देण्यात आले. मेजर जनरल सूजन सिंह उबन यांनी हे युनिट बनवले होते. त्यांनी २२ माऊंटन रेजिमेंटचे नेतृत्व केले होते. त्यामुळे सुरुवातीला ‘एस्टॅब्लिशमेंट २२’ असे नाव देण्यात आले. माजी लष्करप्रमुख दलबीर सिंह यांनी या SFF चे नेतृत्व केले आहे.

SFF युनिट लष्कराचा भाग आहे का?

SFF युनिटस हे लष्कराचा भाग नाही. पण लष्कराच्या ऑपरेशनल कंट्रोल अंतर्गत ते काम करतात. SFF युनिटसचे स्वत:च रँक स्ट्रक्चर आहे. लष्कराच्या रँक इतकाच त्यांचा समान दर्जा आहे. रँक स्ट्रक्चर म्हणजे पद. अन्य स्पेशल फोर्सेसचे युनिट ज्या प्रमाणे अवघड मोहिमा पार पडते, SFF कडे सुद्धा अशाच वेगवेगळया कठीण मोहिमांची जबाबदारी असते.

आव्हानात्मक मोहिमांसाठी या तुकडीतील जवानांना खास प्रशिक्षण दिलेले असते. वेगळी ओळख आणि इतिहास असला तरी, SFF युनिटस लष्कराच्या अन्य तुकड्यांप्रमाणेच तैनात असलेल्या भागात कार्य करते. SFF ची स्वत:ची वेगळी ट्रेनिक संस्था आहे, जिथे त्यांना स्पेशल फोर्सेसप्रमाणे प्रशिक्षित केले जाते. SFF युनिटमध्ये महिला सैनिकही असून त्यांच्याकडे सुद्धा विशेष जबाबदारी असते.

मागच्या काही वर्षात अनेक गुप्त मोहिमांमध्ये SFF ने सहभाग घेतला आहे. १९७१ सालचे भारत-पाकिस्तान युद्ध, अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्ल्यू स्टार, कारगिल युद्ध, दहशतवादविरोधी मोहिमा त्याशिवाय अन्य मोहिमांमध्ये सुद्धा सहभाग घेतला आहे. पण ही सगळी माहिती गोपनीय आहे.

१९७१ च्या युद्धातील SFF चा पराक्रम

१९७१ च्या युद्धात भारतीय लष्कराला आगेकूच करता यावे, यासाठी SFF कडे पूर्व पाकिस्तानातील चटगांवच्या डोंगराळ भागातील (आताचा बांगलादेश) पाकिस्तानी लष्कराची ठिकाणे निष्प्रभावी करण्याची जबाबदारी होती. ‘ऑपरेशन इगल’ असे त्या मोहिमेला नाव देण्यात आले होते. त्यांना विमानाने मोहिम असलेल्या भागात पोहोचवण्यात आले.

पाकिस्तानी लष्कराचे कम्युनिकेशन म्हणजे संपर्क यंत्रणा उद्धवस्त करण्याची त्यांची जबाबदारी होती. बांगलादेशातून बर्माला पळून जाणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांना रोखण्यातही SSF ने महत्त्वाची भूमिका बजावली होती. बर्मा म्हणजे आताचा म्यानमार. एका अंदाजानुसार १९७१ च्या युद्धातील गुप्त मोहिमांमध्ये ३ हजारपेक्षा जास्त SSF कमांडोज सहभागी झाले होते. अनेक SFF कमांडोजचा त्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल सन्मान करण्यात आला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*